कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निर्मात्याच्या भूमिकेत लियोनार्डो

07:00 AM Apr 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ऑस्कर विजेता अभिनेता आणि निर्माता लियोनार्डो डिकॅप्रियो हा फिल्ममेकर शॅनन क्रिंगसोबत एक नवा प्रोजेक्ट घेऊन येत आहे. दोघांनी ‘नाइन लिटिल इंडियन्स’साठी हातमिळवणी केली आहे. यात अमेरिकन मूळ रहिवासी मुलांसोबत एका अमेरिकन बोर्डिंग स्कूलमध्ये झालेल्या दु:खदायक कहाणीला दाखविण्यात येणार आहे. लियानार्डो या माहितीपटाची निर्मिती करणार आहे. याची कहाणी चारोबोन्यू किंवा शार बोह नोह बहिण आणि त्यांच्या बालपणीच्या शालेय सहकाऱ्यांच्या जवळपास दोन दशके दीर्घ कायदेशीर लढाईवर आधारित आहे. या सर्वांनी साउथ डकोटाच्या सेंट पॉल इंडियन मिशन स्कूलमध्ये भयावह गैरवर्तन सहन केले होते. हा माहितीपट मुलांचे शोषण करणाऱ्यांना उत्तरदायी ठरविण्याच्या त्यांच्या संघर्षाला दाखविणार आहे. लियानार्डोची प्रॉडक्शन कंपनी ऐपियनने या माहितीपटाची रेड क्वीन मीडिया आणि टेर्रा मॅटर स्टुडिओसोबत मिळून निर्मिती चालविली आहे. या माहितीपटात शाळेच्या दोन माजी नन आणि सेवकांच्या मुलाखती दाखविल्या जातील, त्यांनी शाळेशी संबंधित पाद्रींवर बलात्कार आणि हत्येचे आरोप केले होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article