Satara News : आधुनिक यंत्र वापरून मसूर कापणीस सुरुवात ; शेतकऱ्यांना दिलासा
कोपर्डे हवेलीमध्ये इंद्रायणी भाताची कापणी जोमात
मसूर : कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली परिसर सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध भात उत्पादक पट्टा मानला जातो. सध्या परिसरात भातकापणी हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी पारंपरिक मजुरांऐवजी आधुनिक हार्वेस्टर यंत्राने कापणी सुरू केली आहे.
भागात प्रामुख्याने इंद्रायणी भाताची लागवड केली जाते. चवीला उत्तम व बाजारपेठेत सतत मागणी असल्याने ऊस उत्पादनानंतर बहुतांश शेतकरी जमीन भात लागवडीखाली आणतात. यंदा पावसाने चांगली साथ दिल्याने पीक जोमदार असून चांगले उत्पादन अपेक्षित आहे.
भात लागवडीपूर्वी चिखलणी, तरवे, रोपांची लागण, औषध फवारणी, खते आदी कामे वेळेत पूर्ण केल्यानंतर आता कापणी व मळणीचा टप्पा सुरू आहे. मजूरटंचाई, वेळेची बचत लक्षात घेऊन शेतकरी यंत्राकडे वळाले आहेत. एका दिवसात यंत्र मोठ्या क्षेत्राची कापणी-मळणी पूर्ण करत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.