For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बैठकीला गैरहजर राहिल्यास कायदेशीर कारवाई करणार

11:27 AM Feb 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
बैठकीला गैरहजर राहिल्यास कायदेशीर कारवाई करणार
Advertisement

जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांचा केडीपी पूर्वतयारी बैठकीत अधिकाऱ्यांना इशारा

Advertisement

बेळगाव : लवकरच केडीपी बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. या बैठकीला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण माहितीसह हजर राहणे सक्तीचे आहे. बैठकीला गैरहजर राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिला. जिल्हा पंचायतीच्या जुन्या सभागृहामध्ये बुधवारी केडीपी पूर्वतयारी बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्थिती गंभीर आहे. कृषी, बागायत, रेशीम, मत्स्य आणि पशुसंगोपन अधिकाऱ्यांनी दुष्काळाचा समर्थपणे सामना करण्यासाठी योग्य ती तयारी करणे आवश्यक आहे. याचबरोबर इतर सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या खात्याशी संबंधित असणारी आवश्यक माहिती घेऊन हजर राहणे गरजेचे आहे. दुष्काळ निवारणासाठी कोणत्या प्रकारे तयारी करावी लागणार याची माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्थिती गंभीर आहे. अनेक भागामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, प्रत्येक गावात दोन याप्रमाणे खासगी कूपनलिका घेण्यासाठी निश्चिती करण्यात यावी. याद्वारे पाणी समस्या दूर करण्यासाठी तयारी करण्यात यावी. बहुग्राम पाणीपुरवठा योजनांची कार्यकारी अभियंत्यांकडून पाहणी करून अहवाल द्यावा, अशी सूचना त्यांनी केली. आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी ग्रुप डी दर्जाचे कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर नेमणूक करून ग्रामीण जनतेला उत्तम आरोग्यसेवा द्यावी. या बैठकीला गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची सूचनाही त्यांनी केली. यावेळी जिल्हा पंचायत उपकार्यदर्शी रेखा ढोळीन्नावर, योजना अधिकारी बसवराज अडवीमठ, योजना संचालक रवी बंगारप्पा, मुख्य लेखाधिकारी परशराम दुडगुंटी, मुख्य योजना अधिकारी गंगाधर दिवटर यांच्यासह विविध खात्याचे जिल्हास्तरीय अधिकारी, तालुका पंचायतचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.