महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिकू आनंदे.....1

06:24 AM Aug 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लहान मूल मोठं होताना त्याला काय काय शिकवू असं प्रत्येक आई-वडिलांना झालेलं असतं. त्यातच त्याचा एखादा शब्द ऐकणं म्हणजे स्वर्गीय आनंद. ‘आई, बाबा, हम्मा, मम्मम’ हे शब्द जेव्हा ऐकतो तेंव्हा आपण खऱ्या अर्थाने श्रीमंत झालेलो असतो. काही आई-वडिलांना मात्र या मुलाला स्पीच थेरपी किंवा काढा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा जिभेवर घासून प्रयत्न करावा लागतो. मग प्राण्यांच्या बाबतीतही हे असंच घडत असणार असं काहीसं वाटून आपण या प्राण्यांच्या राज्याचा विचार करायला लागतो. आपलं मूल लवकर बोलावं यासाठी अगदी झटून प्रयत्न करणारी आई दिसतेच. अशाच एका आईची गोष्ट बालभारतीच्या चौथीच्या पुस्तकात आली आहे. आपल्या मुलाला लवकर बोलता यावं यासाठी इतर प्राण्यांची नेमणूक तिने केली पण व्यर्थ, तिचा मूलगा मूळ भाषेतच बोलू लागला अशी ती कथा वाचताना माझ्या मनात आलं की जर माणसासारखं प्राणीही आपल्या मुलांना परदेशी भाषा बोलायला शिकवत असतील तर काय मज्जा येईल? एकदा एक कावळा आपल्या पिलांना ‘काव काव’ म्हणायला शिकवायला लागला. तेंव्हा त्या घरट्यात कावळ्याच्या पिलाबरोबर इतर दोन पक्षी मात्र ‘काव काव’ न म्हणता ‘कुहू कुहू’ म्हणायला लागले आणि मग कावळ्याचे लक्षात आले ही आपल्या घरात कोणाची तरी बाळं वाढताहेत. मग हे दोन पक्षी चुकून आपल्या घरात आले असावेत म्हणून तो त्यांना सोडायला त्यांच्या घरी जातो. त्याचं चांगुलपण आपल्या कोणाच्या लक्षातही येत नाही. त्यांना कोकिळेच्या घरी सोडल्यानंतर मात्र घरी आल्यावर कावळीची म्हणजे बायकोची बोलणी त्यालाही खावी लागतेच, असो. पण माणसासारखा प्राणी निरनिराळ्या फॉरेन लँग्वेज शिकायला लागला तर काय गंमत होईल अशी एक गोष्ट मनात येऊन गेली आणि अशाच एका वाघोबांनी म्हणजे राजाने आपल्या मुलाला परदेशी भाषा यावी म्हणून अनेक प्राणी पक्षांना बोलावलं. सगळेजण येत प्रयत्न करत. एक दिवस सगळेच जण एकत्र येऊन त्याला शिकवू लागले. ते पाहिल्यानंतर आईला म्हणजे वाघिणीला खूप आनंद झाला. आपलं पोर आता फॉरेनच्या परकीय भाषेमध्ये फाडफाड बोलणार. प्रत्येक पक्षी यायचा, त्याला मनापासून शिकवायचा आणि हा मात्र मनातल्या मनात आणि गालातल्या गालात हसायचा. नंतर मात्र त्याला थोडासा राग येऊ लागला. प्रत्येक जण काहीतरी वेगळा कर्कश अशा आवाजात काही ना काही तरी त्याला शिकवायचा प्रयत्न करत होता. एक दिवस हे सगळे प्राणी एकत्र आल्यानंतर खूपच गडबड गोंधळ वाढला. इकडे वाघीण मात्र मनातल्या मनात आनंदाने खुश झाली होती. पण वाघाच्या पिल्लाला मात्र आता ह्या सगळ्या गोष्टींचा उबग आला आणि त्यांनी शेवटी मायबोलीमध्ये आपला आवाज असा काही काढला किंवा असे काही ठेवणीतले शब्द वापरले की सगळ्या पक्षांचीच बोबडी वळायची वेळ आली. शेवटी आईच्याही लक्षात आलं की परदेशी भाषेच्या मागे लागण्यापेक्षा, मायबोलीच खरी त्यातून हवं तेव्हा, हवं तसं व्यक्त होता येतं आणि हवं ते मनापासून शिकताही येतं किंवा ऐकताही येतं. पण आई वडिलांना कोण सांगणार?

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article