महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कला अकादमीच्या नाट्यामंदिरात पुन्हा गळती

12:33 PM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तियात्र प्रेक्षकांचा झाला रसभंग : दुरुस्तीकामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Advertisement

पणजी : येथील कला अकादमीच्या नाट्यामंदिरात रविवारी सायंकाळी तियात्र सुऊ असताना पाण्याची गळती सुऊ झाल्याने प्रेक्षकांचा रसभंग झाला. त्याबद्दल राज्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. कला अकादमीच्या कोट्यावधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या दुऊस्तीकामाचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. मुसळधार पावसामुळे कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यामंदिरात रविवारी पाणी साचले होते. तियात्र सुरू असतानाच पाणी गळू लागल्याने प्रेक्षक हैराण झाले होते. पावसाच्या पाण्यामुळे प्रेक्षक भिजून गेले होते. नाट्यामंदिरात हा प्रकार सुमारे तासभर सुरु होता. सभागृहात पाणी तुंबले होते. त्यामुळे खर्च केलेले कोट्यावधी ऊपये कला अकादमीवर खर्च न होता नक्की कोणाच्या खिशात गेले, असा संतप्त प्रश्न लोकांकडून उपस्थित केला जात आहे.

Advertisement

भ्रष्टाचार झाला उघड

गेल्या महिन्यात पणजीत पाऊस पडला तेव्हाही कला अकादमीच्या छताला गळती लागली होती. त्यानंतर ठेकेदारावर कारवाईची मागणी जनतेकडून करण्यात आली होती. झाडांची पाने छतावरील पाईपमध्ये अडकल्याने हा प्रकार घडल्याचे तेव्हा पीडब्ल्यूडीने अहवालात नमूद केले होते. एवढेच नव्हे, तर बांधकामाच्या कंत्राटदाराला क्लीन चिटही दिली होती. आता रविवारी पडलेल्या पावसात तियात्र सुऊ असतानाच पुन्हा गळती झाली. त्यामुळे कला अकादमीतील सर्व संबंधितांचा भ्रष्टाचार, खोटारडेपणा उघड झाला आहे.

कला अकादमी संपवण्याचा डाव

भारतातील पहिल्या क्रमांकाची आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सांस्कृतिक वास्तू असलेल्या कला अकादमीची भाजप सरकारने वाताहात केली आहे. दुरुस्तीच्या नावाखाली कला अकादमी संपवून टाकण्याचा प्रयत्न तर नाही ना? असा सवाल कलाकारांनी केला आहे. कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर कला मंदिराच्या वातानुकूलित यंत्रणेत (एसी) बिघाड झाल्याने पावसाचे पाणी गळत आहे. एसी यंत्रणेच्या दुऊस्तीचे काम सुरू झाले आहे. वातानुकूलित यंत्रणेसाठी बसवण्यात आलेल्या एसी डक्टमधून कला मंदिरात पाणी शिरत आहे, अशी माहिती पीडब्ल्यूडी खात्याचे प्रधान अभियंता उत्तम पार्सेकर यांनी दिली आहे. दुऊस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे पार्सेकर यांनी स्पष्ट केले आहे.

कला अकादमीतील गळतीमुळे विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

रविवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसात कला अकादमीला पुन्हा एकदा गळती लागल्याने विरोधी पक्षांनी भाजप सरकार आणि कल व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. कला अकादमी नूतनीकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. गोवा प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी सुनील कवठणकर यांनी कला अकादमी हे 5-डी पावसाचा अनुभव देणारे देशातील पहिले ऑडीटोरीयम असल्याची खोचक टीका केली आहे. मंत्री गावडे यांनी आता तरी अकादमीवर ‘ताडपत्री’ घालण्याची कृपा करावी, अन्यथा त्यांना गोमंतकीय जनता ‘तडीपार’ केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला आहे. आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी कला अकादमी ‘रेन्स डान्स’ साठी चांगली जागा असल्याचे घोषित करावे, अशी टिपणी केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत अकादमीच्या नूतनीकरणाची चौकशी करावी, असे त्यांनी सांगितले आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाने देखील अकादमीची चार्ल्स कुरैय्या फाऊंडेशनमार्फत चौकशी करावी, असे सुचवले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तेथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पहाणी करावी आणि अकादमी पुन्हा एकदा कुरैय्या फाऊंडेशनच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी केली.

नाटके, तियात्रांसाठी अकादमी धोकादायक

ते म्हणाले की, रु. 70 कोटी एवढी मोठी रक्कम खर्च करून देखील तेथे पाणी गळती होते हाच निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा पुरावा आहे. कलाकार आणि प्रेक्षकांसाठी अकादमी धोकादायक बनली असून नाटक चालू असताना पाणी गळती झाली तशा प्रकारे बांधकाम कोसळ्याची भीती कलाकार प्रेक्षकांमधून व्यक्त होत आहे. नाटके, तियात्रांसाठी अकादमी धोक्याची बनल्याचे स्पष्टपणे दिसत असून एवढी कोट्यावधी रक्कम गेली कुठे ? कशावर खर्च झाली ? याचा तपास झालाच पाहिजे असे कामत यांनी नमूद केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article