शहापूर -हिंदवाडीत जलवाहिनींना गळती
दररोज हजारो लिटर पाणी वाया, कचरा समस्या देखील जटील
► प्रतिनिधी / बेळगाव
शहरात एकीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असतानाच दुसरीकडे हिंदवाडी आणि शहापूर परिसरात मात्र, मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. जलवाहिन्यांना लागलेली गळती काढण्याकडे महापालिका आणि एल अॅन्ड टी कंपणीने सोयीस्कररित्या दुल केले. असल्याने या अंधळ्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
बेळगावकरानी चोवीस तास पाण्याचे गाजर दाखवून महापालिकेने शहराच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी एल अॅन्ड टी कंपनीकडे सोपविली आहे. मात्र, चोवीस तास पाणी योजना ही एक दिवा स्वप्नच बनून राहिली आहे. कारण, अद्यापही शहर व उपनगरात जलवाहिनी घालण्यासाठी खोदकाम केले जात आहे. चोवीस तास पाणी तर दुरच सध्या दहा दिवसाआड केवळ दोन तास पाणी पुरवठा केला जात असल्याने अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच ठिकठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागून देखील त्यांची दुऊस्ती करण्याकडे दुल केले जात. असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. विषेश कऊन शहापूर स्मशानभूमी समोरील जलवाहिनीला गेल्या काही वर्षापासून मोठी गळती लागली आहे.
शहापूर स्मशानभूमी समोरील गटारीतून दररोज हजारो लिटर पाणी जलवाहिनीला गळती लागल्याने वाया जात आहे. एखाद्या जीवंत झऱ्याप्रमाणे जमीनीतून पाणी झिरपून ते गटारीकडे येत आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी करून देखील जलवाहिनीची दुरूस्ती करण्याकडे दुल करण्यात आले आहे. तसेच हिंदवाडी येथे देखील अशा प्रकारे जलवाहिनीला गळती लागून गटारीतून पाणी वाहत आहे. एल अॅन्ड टी च्या दुलपणामुळे नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नगरसेवकांनी देखील या समस्येकडे डोळेझाक केली आहे.
भूमीगत डस्टबिन कुचकामी
शहरातील कचरा समस्या मार्गी लागण्यासाठी महापालिकेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दक्षिण मतदार संघात विविध ठिकाणी भुमीगत कंटेनर बसविण्यात आले आहे. मात्र हिंदवाडी परिसरातील भूमीगत कंटेनर परिसरातील रहिवाश्यांसाठी डोकेदुखी बनले आहेत. कंटेनर्समध्ये कचरा टाकण्याऐवजी बहुतांशजण कटंनेर परिसरातच कचरा टाकून देत आहेत. त्यामुळे उकीरड्याचे स्वरूप प्राप्त झाले असून त्यावर मोकाट कुत्री आणि जनावरांचा वावर वाढला आहे.