महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नंदगड डॅमच्या कालव्यांचे दरवाजे निकामी झाल्याने गळती

10:34 AM Oct 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पुढील दोन महिन्यातच डॅम पूर्णपणे रिकामी होण्याची भीती : त्वरित दुरुस्तीची मागणी

Advertisement

वार्ताहर/हलशी

Advertisement

नंदगड गावाजवळ असलेल्या डॅमच्या उजव्या व डाव्या कालव्याचे दरवाजे पूर्णपणे नादुरुस्त झाले असून, दरवाजे ऑपरेट करण्यासाठी बांधण्यात आलेले स्लॅब कोसळले आहे. त्यामुळे पाण्याची गळती होऊन पाणी जात असल्याने डॅममध्ये पूर्ण क्षमतेने पाण्याची साठवणूक होऊनदेखील डॅमचा कालवा तसेच इतर ठिकाणाहून होत असलेल्या गळतीमुळे पुढील दोन महिन्यातच डॅम पूर्णपणे रिकामी होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. फेब्रुवारीमध्ये नंदगड येथील महालक्ष्मी यात्रा होणार आहे.

यासाठी या डॅममधून पाणीपुरवठा करण्याची योजना असल्याने या दोन्ही कालव्यांच्या दरवाजाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नंदगड ग्रामस्थांतून होत आहे. नंदगड गावच्या पश्चिमेला आमदार बसाप्पण्णा अरगांवी यांच्या संकल्पनेतून डॅम बांधण्यात आले आहे. या डॅममधील पाण्याचा उपयोग आसपासच्या गावातील शेतीसाठी करण्यात येतो. या डॅममधून नंदगड गावासाठी पाणीपुरवठा करण्याची योजना आखण्यात आली आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने डॅम पूर्ण क्षमतेने भरले आहे. मात्र डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाण्याची गळती सुरू असून डॅमच्या कालव्याचे दरवाजे अर्धवट उघडलेल्या स्थितीत असल्याने डॅममधील पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने डॅममधील पाणी येत्या महिन्याभरात तळ गाठण्याचा धोका निर्माण झाला आहे.

फेब्रुवारीमध्ये महालक्ष्मी यात्रा

फेब्रुवारी महिन्यात 25 वर्षानंतर नंदगड येथील महालक्ष्मी यात्रा होणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीने या डॅममधून पाणीपुरवठा करण्याची योजना आखली आहे. मात्र होत असलेल्या पाणी गळतीमुळे डॅम रिकामे होण्याची भीती निर्माण झाली आहे. यासाठी लघुपाटबंधारे खात्याने तातडीने या धरणाची दुरुस्ती करून पाणीसाठा राहील, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या कालव्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीनेही यात्रोत्सवाचा विचार करून डॅमची दुरुस्ती करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी नंदगड ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article