शस्त्रास्त्र खाली ठेवा, गाझाची सत्ता सोडा
पहिल्यांदाच अरब देशांकडून हमासच्या हल्ल्याची निंदा
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
कतार, सौदी अरेबिया आणि इजिप्तसमवेत अनेक अरब देशांनी एका अभूतपूर्व पावलाच्या अंतर्गत हमासला शस्त्रास्त्रs खाली ठेवण्याची आणि गाझावरील स्वत:चे शासन समाप्त करण्याची सूचना केली आहे. हमासने शस्त्रास्त्रs खाली ठेवल्यास आणि शासन संपुष्टात आणल्यास या क्षेत्रात सुरू असलेले विनाशकारी युद्ध समाप्त होऊ शकेल असे या देशांनी म्हटले आहे.
अरब लीगच्या सर्व 22 सदस्य देशांनी पहिल्यांदाच 7 ऑक्टोबर 2023 रोजीच्या हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याची निंदा केली आहे. एका परिषदेत या मुस्लीम देशांनी 7 पानी घोषणापत्रावर स्वाक्षरी केली आहे. या देशांमध्ये सौदी अरेबिया, कतार, इजिप्त, जॉर्डन आणि तुर्किये सामील आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टाइनदरम्यान द्विराष्ट्र तोडग्याच्या अंमलबजावणीच्या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. ‘पॅलेस्टाइनच्या प्रश्नाचे शांततापूर्ण आणि द्विराष्ट्र तोडग्याचे कार्यान्वयन’ नावाच्या परिषदेनंतर जारी घोषणापत्रात हमासला सर्व ओलिसांची मुक्तता करणे, शस्त्रास्त्रs खाली ठेवणे आणि गाझावरील स्वत:ची सत्ता सोडण्याचा आग्रह करण्यात आला आहे.
गाझामधील युद्ध समाप्त करण्याच्या संदर्भात हमासला गाझामधील स्वत:चे शासन समाप्त करावे लागेल आणि स्वत:ची शस्त्रास्त्रs पॅलेस्टिनी प्राधिकरणाकडे सोपवावी लागतील, ज्यात आंतरराष्ट्रीय समुदायाचे सहकार्य आणि समर्थन असेल, जेणेकरून एक सार्वभौम आणि स्वतंत्र पॅलेस्टिनी देशाचे लक्ष्य प्राप्त करता येऊ शकेल असे दस्तऐवजात म्हटले गेले आहे.
न्यूयॉर्क घोषणापत्र : शांततेच्या दिशेने पाऊल
या घोषणापत्राला ‘न्यूयॉर्क घोषणापत्र’ही म्हटले जात आहे. या दस्तऐवजात गाझामधील युद्ध समाप्त करणे आणि इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी एक टप्पाबद्ध योजना सादर करण्यात आली आहे. या योजनेचे अंतिम लक्ष्य एक स्वतंत्र, शस्त्रविहिन पॅलेस्टाइनची निर्मिती करणे आहे, जो इस्रायलसोबत शांततेत सहअस्तित्वात राहू शकेल. घोषणापत्रात पॅलेस्टिनी अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याच्या उपाययोजना आणि पॅलेस्टिनी प्राधिकरणाच्या शालेय अभ्यासक्रमातू प्रक्षोभक आणि द्वेषपूर्ण सामग्री हटविण्याची मागणी करण्यात आली आहे, जी इस्रायलवरही लागू होते.
17 देश, अरब लीग अणि पूर्ण युरोपीय महासंघाने या घोषणापत्राचे समर्थन केले आहे. फ्रान्सने सौदी अरेबियासोबत या परिषदेचे सह-अध्यक्षत्व केले. पहिल्यांदाच अरब अणि मध्यपूर्वेतील देशांनी हमासची निंदा केली, 7 ऑक्टोबरच्या घटनेची निंदा केली, हमासला शस्त्रास्त्रs खाली ठेवण्यास सांगत पॅलेसिटनी प्राधिकरणाला त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची सूचना केली. यातून भविष्यात इस्रायलसोबत संबंध सामान्य करण्याची इच्छा स्पष्ट स्वरुपात व्यक्त होते, असे उद्गार फ्रान्सचे विदेशमंत्री जीन-नोएल बॅरोट यांनी काढले आहेत.
इस्रायल-अमेरिकेचा बहिष्कार
या परिषदेवर इस्रायल आणि अमेरिकेने बहिष्कार टाकला, इस्रायलचे वर्तमान सरकार द्विराष्ट्र तोडग्याला फेटाळणारे आहे. दुसरीकडे घोषणापत्रात इस्रायलला युद्ध समाप्त करणे, पॅलेस्टिनी देशाला मान्यता देणे आणि वापसीच्या अधिकाराला मान्यता देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इस्रायलच्या दृष्टीकोनातून ही वादग्रस्त मागणी आहे.