For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वकिलांनी परवडण्यायोग्य शुल्क आकारावे

11:56 AM Feb 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
वकिलांनी परवडण्यायोग्य शुल्क आकारावे
Advertisement

कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांचे आवाहन : ’हमारा संविधान, हमारा सन्मान’चे उद्घाटन

Advertisement

पणजी : संविधानाचे पावित्र्य जपणे आणि त्याचा सांभाळ करणे ही वकिलांची जबाबदारी आहे. त्याचबरोबर आपल्या अशिलाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून त्यांना परवडण्यायोग्य शुल्क आकारणे हे सुद्धा वकिलांचे सामाजिक दायित्व आहे, असे प्रतिपादन कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी केले. ‘रीच द अनरीच’ या तत्वावर वकिलांनी कार्य केले पाहिजे, असेही ते म्हणाले. बुधवारी पणजीत कला व संस्कृती संचालनालयाच्या सभागृहात आयोजित ‘हमारा संविधान, हमारा सन्मान’ अभियानच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. गोवा राज्य कायदा सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव विजया आम्रे यांचीही यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमास वकिल आणि कायद्याचे विद्यार्थी हजर होते.

‘टेली लॉ’चा लाभ द्यावा

Advertisement

‘डोन्ट सेल युवर सोल्स’ असे सांगताना सिक्वेरा यांनी, देशात ‘टेली लॉ’ सेवा प्रारंभ झाल्यास सात वर्षे पूर्ण झाली आहेत. तेव्हापासून आतापर्यंत देशातील 70 लाख लोकांना या सेवेचा लाभ मिळाला आहे. गोव्यातही या सेवेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

मोफत कायदा सल्ल्यासाठी संपर्क साधावा

‘हमारा संविधान, हमारा सन्मान’ कार्यक्रमात मार्गदर्शन करताना गोवा राज्य कायदा सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव विजया आम्रे यांनी सांगितले की प्राधिकरणतर्फे शेकडो गरजू लोकांना मोफत कयदा सेवा आणि सल्ला देण्यात येतो. एखाद्यास या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर 15100 या वॉटसअॅप क्रमांकावर फोन करावा, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.