Solapur : सोलापुरात गळफास घेऊन वकिलाची आत्महत्या!
मानसिक तणावातून सोलापुरात वकिलाची आत्महत्या
सोलापूर : सोलापूर येथील विजापूर रोडवरील समर्थ सोसायटी, एस.आर.पी. कॅम्प येथील तरुण वकील सागर श्रीकांत मंद्रूपकर (वय-३२, रा. समर्थ सोसायटी, एस.आर.पी. कॅम्प) यांनी स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
बुधबार १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारास पावणेपाच वाजता ही घटना उघडकीस आली. अॅड. सागर मंद्रूपकर हे गेल्या काही दिवसांपासून घरगुती बाद आणिमानसिक तणावात होते. आत्महत्येनंतर त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत "घरगुती त्रासामुळे मी आत्महत्या करीत मृत्यूस आहे, माझ्या कोणालाही जबाबदार धरू नये" असे लिहिलेले असल्याचे विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी सांगितले.
अॅङ मंद्रूपकर यांनी आपल्या घरातील पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये छताला बसवलेल्या लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला. काही वेळानंतर घरच्यांनी दार ठोठावून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आत पाहिले असता सागर मंद्रूपकर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली.
विजापूर नाका पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल व्ही.डी. घुगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मंद्रूपकर यांना खाली उतरवले व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीदरम्यान त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.
पोलिस तपास सुरू
घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली असून विजापूर नाका पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मृताच्या मोबाईल फोन, कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि वैयक्तिक व्यवहार तपासले जात आहेत. मंद्रूपकर यांच्या आत्महत्येचे कारण घरगुती बाद असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र आम्ही सर्व शक्य बाबींची चौकशी करत आहोत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अधिक तपशील स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.