For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंत्यसंस्कारानिमित्त आलिशान पार्टी

06:09 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
अंत्यसंस्कारानिमित्त आलिशान पार्टी
Advertisement

भेटवस्तूंचे वाटप, 500 जणांना केले निमंत्रित

Advertisement

जेव्हा एखाद्या स्वकीयाचा मृत्यू होतो, तेव्हा त्या दु:खातून बाहेर पडण्यास अनेक महिने किंवा कित्येकदा वर्षेही लागू शकतात. स्वकीयांना गमाविण्याचे दु:ख सहजपणे पचविता येत नाही. विशेषकरून एखाद्यासोबतचे नाते अत्यंत जवळचे राहिले असेल तर हे दु:ख अधिकच तीव्र असते. तर आयुष्याच्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यास जीवनच बदलून जाते. परंतु एका महिलेने स्वत:च्या पतीच्या मृत्यूनंतर केलेले कृत्य लोकांना समजण्याच्या पलिकडे होते.

केटी यंगचे 39 वर्षीय पती ब्रँडन यांचा 17 मे रोजी एका स्ट्रोकमुळे मृत्यू झाला होता. केटी यांनी सामान्य अंत्यसंस्कार करण्यासाठी एक फ्युनरल पार्टीच आयोजित केली. माझे 8, 10 आणि 12 वर्षांच्या तीन मुलांना स्वत:च्या वडिलांच्या अंत्यसंस्कारामुळे धक्का बसू नये अशी माझी इच्छा होती. या घटनेकडे पाहून त्यांनी वडिलांचे स्मरण करणे अशी माझी इच्छा होती. ब्रँडन यांच्यासाठी पारंपरिक अंत्यसंस्काराविषयी नियोजन करू लागल्यावर मी आजारी पडते. मी चर्चमध्ये बसणे आणि भाषणांच्या माध्यमातून रडण्याविषयी विचारही करू शकत नव्हते. हे माझ्या मुलांसाठी यातनादायी आणि माझ्यासाठी असह्या ठरले होते. मी ब्रँडन यांना अशाप्रकारे दु:खी होत आठवणीत ठेवू इच्छित नव्हते असे 40 वर्षीय यंग यांनी सांगितले.

Advertisement

यंग यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या फ्यूनरल पार्टीचा एक व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल झाला आहे. यात 500 लोक सामील झाले होते. मुलांसाठी अॅक्टिव्हिटीपासून झोपाळे देखील उभारण्यात आले होते. तसेच येथे लोकांना रिटर्न गिप्ट म्हणून देण्यात आलेल्या गुडी बॅगमध्ये बँडन यांनी तयार केलेली चित्रे देण्यात आली.

ब्रँडन यांच्याकडे एक मोठे म्युझिक रेकॉर्ड कलेक्शन होते, जे ते लोकांसोबत शेअर करणे पसंत करायचे आणि याचमुळे आम्ही लोकांना ते कलेक्शन दाखविले जेणेकून त्यांच्या आठवणीचा एक तुकडा ते स्वत:सोबत घेऊन जातील असे यंग यांनी म्हटले आहे. ब्रँड यांना निरोप देताना कुणीच दु:खी होऊ नये अशी इच्छा होती. तसेच त्यांचे पसंतीचे ठिकाण म्हणजे आमचे घर होते. पार्टीमध्ये जणू तेथे ते वावरत आहेत असे वाटत होते असे यंग यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.