कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लावाचा गेमिंग फोन ‘प्ले अल्ट्रा 5-जी’ लाँच

06:04 AM Aug 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

6.67 इंचाचा डिस्प्ले : सुरुवातीची किंमत 14, 999 रुपये : विविध वैशिष्ट्यो

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

भारतीय स्मार्टफोन ब्रँड लावा यांनी भारतात त्यांचा नवीन 5जी गेमिंग फोन लावा प्ले अल्ट्रा 5जी लाँच केला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंशन 7300 एसओसी प्रोसेसर, 6.67 इंच 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट डिस्प्ले, 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी आणि 50 एमपी कॅमेरा अशी वैशिष्ट्यो आहेत.

कंपनीने त्याची सुरुवातीची किंमत 14,999 ठेवली आहे. लावा प्ले अल्ट्रा 5जीची विक्री 25 ऑगस्ट 2025 पासून अॅमेझॉन आणि लावाच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू होईल. आयसीआयसीआय, एसबीआय, एचडीएफसी बँक कार्डवर फोनवर 1,000 रुपयांची त्वरित बँक सवलत देखील दिली जात आहे. हे शाओमी, रियलमी आणि व्हिवोच्या 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या 5जी फोनशी स्पर्धा करणार आहे.

लावा प्ले अल्ट्रा 5जीची फिचर्स :

डिस्प्ले: लावा प्ले अल्ट्रा 5जी मध्ये 6.67-इंचाचा फुल-एचडीप्लस अमोलेड डिस्प्ले आहे. तो 120 हर्टझ रिफ्रेश रेटसह येतो, जो सहज दृश्ये आणि रंग देतो.

प्रोसेसर: फोन मीडियाटेक डायमेंशन 7300 एसओसी वर आधारीत आहे. तो अँड्रॉइड 15 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

कॅमेरा: लावा प्ले अल्ट्रा 5जी मध्ये सोनी आयएमएक्स 682 सेन्सरसह 64 एमपीचा प्राथमिक रियर कॅमेरा आहे.. फोनचा फ्रंट कॅमेरा 13 एमपी आहे.

बॅटरी: फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी लावा ब्लेझ 33 डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000 एमएएच बॅटरी आहे.

रॅम आणि स्टोरेज: हा स्मार्टफोन 6 जीबीसह 128 जीबी आणि 8 जीबीसह 128 जीबी स्टोरेज पर्यायांसह बाजारात लाँच करण्यात आला आहे. वाय-फाय 6 ई, ब्लूटूथ 5.2 कनेक्टिंग फीचर आणि जीपीएस सिस्टम देण्यात आली आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article