‘लावा’चा नवा युवा-2 स्मार्टफोन लाँच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय स्मार्टफोन कंपनी लावा यांनी आपला नवा युवा-2 5जी स्मार्टफोन नुकताच लॉन्च केला आहे. युनिसॉक टी 760 या प्रोसेसरसह येणाऱ्या या फोनला पंच होल डिझाईन डिस्प्ले दिला गेला आहे. यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असणार आहे.
सदरचा स्मार्टफोन हा 9499 रुपयांना उपलब्ध होणार असून हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येणार आहे. कंपनीच्या रिटेल आउटलेटमध्ये सदरचा स्मार्टफोन ग्राहकांना खरेदी करता येणार असून मार्बल ब्लॅक आणि मार्बल व्हाईट या दोन रंगांमध्ये कंपनीने हा फोन लाँच केला आहे. 6.67 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले याला दिला असून 50 मेगापिक्सलचा प्रायमरी पॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट पॅमेरा हा 8 मेगापिक्सलचा दिला गेला असून 5000 एमएएचची बॅटरी दिली गेली आहे. 18 डब्ल्यूचा वायर चार्जर देण्यात आलाय.
मोबाईलची वैशिष्ट्यो
? 6.67 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले
? 4 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज
? युनिसॉक टी 760 चा प्रोसेसर
? 50 मेगापिक्सलचा प्रायमरी, 2 मेगापिक्सलचा डेप्थ पॅमेरा, 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
? 5000 एमएएचची बॅटरी, 18 डब्ल्यू चार्जर