लॉरा वोल्वार्ड, मुथुसामी यांना आयसीसीचा मासिक पुरस्कार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दक्षिण आफ्रिका महिला संघाची कर्णधार लॉरा वोल्वार्डचा नेतृत्व आणि फलंदाजीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी आयसीसीने तिची ऑक्टोबरमधील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून केली. ती महिला क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. पुरुष विभागात हा पुरस्कार दक्षिण आफ्रिकेच्याच सेनुरन मुथुसामीला मिळाला.
ऑक्टोबरमध्ये महिला विश्वचषकात वोल्वार्डने आठ एकदिवशीय सामने खेळले आणि 67.14 च्या आश्चर्यकारक सरासरीने आणि 97.91 च्या प्रभावी स्ट्राईक रेटने 470 धावा केल्या. उजव्या हाताच्या या फलंदाजाने म्हटले की ऑक्टोबरसाठी मासिक पुरस्कार मिळवणे हा एक अविश्वसनीय रोमांच आहे. महिला क्रिकेटसाठी ऐतिहासिक कार्यक्रमाचा भाग म्हणून भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील संघाच्या कामगिरीनंतर हा पुरस्कार जिंकणे हा सन्मान आहे, असे ती म्हणाली.
वोल्वार्डच्या विश्वचषक मोहीमेतील प्रमुख खेळी इंग्लंडविरुद्ध उपांत्य सामन्यात झाली. या कठीण सामन्यात, वोल्वार्डने 143 चेंडूत 169 धावा फटकावल्या आणि द. आफ्रिकेला 320 धावांचे मोठे लक्ष्य उभे करण्यास मदत केली. अखेर इंग्लंडसाठी हे लक्ष्य खूपच जास्त ठरले आणि दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या पहिल्या विश्वचषक अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. एकूण वोल्वार्डने ऑक्टोबरमध्ये तीन अर्धशतके आणि एक जबरदस्त शतक ठोकले. ज्यामुळे द. आफ्रिकेने विश्वचषक निर्णायक सामन्यात आपले स्थान निश्चित केले. वोल्वार्डच्या अपवादात्मक सातत्य आणि सामना जिंकणाऱ्या कामगिरीमुळे ती आयसीसी महिला क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचली आणि ऑक्टाब्sार 2025 साठी आयसीसी महिला खेळाडूचा पुरस्कारही मिळवला.
सेनुरन मुथुसामी ऑक्टोबरमध्ये सर्वोत्तम
पाकिस्तानमधील कसोटी मालिकेत केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज सेनुरन मुथुसामीला ऑक्टोबरमधील सर्वोत्तम खेळाडूचा आयसीसी पुरस्कार मिळाला.
मुथुस्वामीने पाकिस्तानचा अनुभवी फिरकी गोलंदाज नोमन अली आणि अफगाणिस्तानचा प्रमुख गोलंदाज रशीद खान या पुरस्काराच्या शर्यतीत होते. 31 वर्षीय खेळाडूने त्याच्या कारकिर्दीतील पहिले आयसीसी पीओटीएम पुरस्कार जिंकल्यानंतर आनंद व्यक्त केला. पाकिस्तानमधील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशा बरोबरीत संपलेल्या मुथुस्वामीने 53 धावांच्या सरासरीने 106 धावा केल्या आणि 11 बळी घेत मालिकावीराचा पुरस्कार जिंकला. पहिल्या कसोटीत, मुथुस्वामीने कारिकर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना 174 धावांत 11 धावा केल्या. पहिल्या डावात सहा आणि दुसऱ्या डावात 5 बळी मिळविले.