For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आयएनएस अर्नाळा’चे जलावतरण

06:07 AM Jun 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘आयएनएस अर्नाळा’चे जलावतरण
Advertisement

महाराष्ट्रातील किल्ल्यावरून युद्धनौकेचे नामकरण ; विशाखापट्टणम येथील नौदल डॉकयार्डमध्ये कार्यन्वित

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील पहिली उथळ (शैलो) पाण्यातील पाणबुडीविरोधी जहाज-युद्धनौका (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) बुधवारी कार्यन्वित करण्यात आली. विशाखापट्टणम येथील नेव्ही डॉकयार्डमध्ये या युद्धनौकेचे जलावतरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सीडीएस जनरल अनिल चौहान उपस्थित होते. या युद्धनौकेचे नामकरण महाराष्ट्रातील वसई येथील ऐतिहासिक अर्नाळा किल्ल्यावरून ठेवले आहे. हिंदी महासागरात नौदलाच्या मजबूत उपस्थितीसाठी हे जहाज डिझाइन करण्यात आले असून ते उथळ पाण्यात शत्रूच्या पाणबुड्या शोधून, ट्रॅक करून निक्रिय करणार आहे.

Advertisement

आयएनएस अर्नाळा 8 मे रोजी भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आले. त्यानंतर आता बुधवारी झालेल्या कमिशनिंग समारंभात 16 एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी श्रेणीतील जहाजांपैकी पहिल्या जहाजाचा भारतीय नौदलात औपचारिक समावेश करण्यात आला. मेसर्स गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (जीआरएसई) कोलकाता आणि मेसर्स एल अॅण्ड टी शिपबिल्डर्स यांच्यासोबत सार्वजनिक खासगी भागीदारी (एसएसएस) अंतर्गत या युद्धनौकेची डिझाईन आणि बांधणी करण्यात आली. यापूर्वी 15 जानेवारी 2025 रोजी आयएनएस सुरत (विध्वंसक), आयएनएस नीलगिरी (स्टिल्थ फ्रिगेट) आणि आयएनएस वागशीर (पाणबुडी) या तीन युद्धनौकांचे जलावतरण करण्यात आले होते. याप्रसंगी पंतप्रधानांनी या तीन अत्याधुनिक युद्धनौकांनी नौदलाची ताकद आणखी वाढवल्याचे स्पष्ट केले होते.

आयएनएस अर्नाळा युद्धनौका 77 मीटर लांब आणि 1,490 टनांपेक्षा जास्त वजनाची आहे. त्यात डिझेल इंजिन आणि वॉटरजेटचे अनोखे संयोजन आहे. हे  भारतीय नौदलाच्या ताफ्यातील सर्वात मोठे उथळ पाण्यातील जहाज असणार आहे. ते ताशी 46 किलोमीटर वेगाने फिरण्यास सक्षम आहे. सद्यस्थितीत या युद्धनौकेवर 57 नौदल कर्मचाऱ्यांना तैनात केले जाणार आहे.

‘अर्नाळा’चे वैशिष्ट्या

ही युद्धनौका किनारी भागात पाणबुड्यांविरुद्धच्या कारवाया लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. या युद्धनौकेची प्रमुख वैशिष्ट्यो म्हणजे पाणबुड्या शोधणे आणि नष्ट करणे, समुद्रात अडकलेल्या लोकांना वाचवणे आणि लहान सागरी धोक्यांना तोंड देणे ही आहेत.

आयएनएस अर्नाळाची निर्मिती संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबी भारताच्या यशाचा पुरावा आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल), एल अॅण्ड टी, महिंद्रा डिफेन्स आणि एमईआयएल सारख्या भारतीय कंपन्यांनी बनवलेल्या प्रगत शस्त्रs आणि सेन्सरने सुसज्ज असलेली ही युद्धनौका आहे. त्याची चिलखती रचना त्याला सागरी आव्हानांना तोंड देण्यास सक्षम करते. त्यात आरबीयू-6000 अँटी-सबमरीन रॉकेट लाँचर बसवले असून ते 213 मिमी अँटी-सबमरीन रॉकेट सिस्टमद्वारे शत्रूच्या पाणबुड्यांवर क्षेपणास्त्रांचा मारा करू शकते.

भारतीय नौदल मजबूत

भारतीय नौदलाकडे एकूण 20 पाणबुड्या आहेत. यामध्ये 2 अणुऊर्जेवर चालणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुड्या, एक अणुऊर्जेवर चालणारी अॅटॅकर पाणबुडी आणि 17 पारंपरिक डिझेल-इलेक्ट्रिक अॅटॅकर पाणबुड्यांचा समावेश आहे. त्याशिवाय 13 विध्वंसक आहेत. याशिवाय, 15 फ्रिगेट्स, 18 कॉर्व्हेट, एक उभयचर वाहतूक गोदी (आयएनएस जलाश्व), 4 टँक लँडिंग जहाजे, 8 लँडिंग क्राफ्ट युटिलिटी, एक माइन काउंटरमेजर जहाज आणि 30 गस्ती जहाजे आहेत. भारतीय नौदलाचे 2035 पर्यंत 175 जहाजांचा ताफा तयार करण्याचे उद्दिष्ट असून त्यापैकी 50 जहाजे सध्या बांधकामाधीन आहेत. 2025 पर्यंत भारतीय नौदलाकडे सुमारे 135 हून युद्धनौका सक्रिय सेवेत आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या जहाजांचा समावेश आहे. तशंज्ह आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांतसह 2 आधुनिक विमानवाहू जहाजेही आहेत.

Advertisement
Tags :

.