महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘लोकमान्य’तर्फे सोने तारण कर्ज योजनेचा शुभारंभ

11:27 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकमान्य सोसायटीच्या एकूण 26 शाखांमध्ये योजना कार्यान्वित : नाममात्र प्रक्रिया शुल्कामध्ये घेता येतो लाभ

Advertisement

बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक येथील सभासदांसाठी सोने तारण कर्ज योजना जाहीर केली आहे. उपरोक्त तिन्ही राज्यांमधील आणखी 16 शाखांमध्ये ही योजना उपलब्ध असून, लोकमान्यच्या सभासदांना 11.99 टक्के व्याजदरात सोने तारण कर्ज मिळणार आहे. सोसायटीच्या बेळगाव येथील कार्यालयात मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात संचालक सई ठाकुर-बिजलानी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ केला. याप्रसंगी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित दीक्षित, कर्ज विभाग प्रमुख नागेश नलावडे, साहाय्यक विभागीय व्यवस्थापक संतोष कृष्णाचे, विमा विभाग प्रमुख राहुल पाटील, वरिष्ठ व्यवस्थापक सुनील तलवार, वरिष्ठ व्यवस्थापक रोजारिओ गामा, शाखा व्यवस्थापक ज्योती रेगे उपस्थित होते.

Advertisement

याचबरोबर ज्या 16 शाखांमध्ये ही योजना सुरू झाली, तेथील अधिकाऱ्यांकडूनही योजनेचा शुभारंभ करण्यात आला. बुधवारपासून लोकमान्य सोसायटीच्या एकूण 26 शाखांमध्ये ही योजना कार्यान्वित झाली आहे. ज्या सभासदांना तातडीने आर्थिक साहाय्याची गरज आहे, त्यांना ही योजना उपयुक्त ठरेल. या योजनेमध्ये लोकमान्यकडून प्रति 10 ग्रॅमला 53 हजार रुपयांचे मूल्यांकन देण्यात येणार असून, कर्ज परताव्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. नाममात्र प्रक्रिया शुल्कामध्ये योजनेचा लाभ खातेदारांना घेता येणार असून, चार विविध योजनांद्वारे नागरिकांना कर्जपुरवठा केला जाईल असे सोसायटीचे सीईओ अभिजित दीक्षित यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article