महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नायडू यांच्यावरील पुस्तकांचे अनावरण

06:21 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रविवारी येथे माजी उपराष्ट्रपती आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांच्यावर लिहिण्यात आलेल्या 3 पुस्तकांचे अनावरण होणार आहे. रविवारी व्यंकय्या नायडू यांच्या वयाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त हा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Advertisement

हा कार्यक्रम हैद्राबाद येथील गाचीबोलीमधील अन्वय कन्व्हेन्शन केंद्रात होणार आहे. या पुस्तकांमध्ये त्यांच्या चरित्रासाही समावेश असून हे चरित्र ‘हिंदू’ या वृत्तपत्राच्या हैद्राबाद आवृत्तीचे माजी निवासी संपादक एस. नागेश कुमार यांनी लिहिले आहे. या चरित्रग्रंथाचे नाव ‘व्यंकय्या नायडू-लाईफ इन सर्व्हिस’ असे आहे. तसेच आय. बी. सुब्बाराव यांनी प्रकाशित केलेल्या छायाचित्र पुस्तकाचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमासाठी रविवारी हैद्राबादला येत आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article