महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजपच्या सदस्य अभियानाचा शुभारंभ

06:46 AM Sep 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान मोदींपासून प्रारंभ : अमित शहा, जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह यांचीही उपस्थिती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय सदस्यत्व अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम पक्षाचे सदस्यत्व घेतले. यानंतर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा पक्षाचे सदस्यत्व घेतले.

आज भाजपच्या सदस्यत्व मोहिमेची दुसरी फेरी सुरू होत असल्याबाबत पंतप्रधान मोदींनी समाधान व्यक्त केले. भारतीय जनसंघापासून आतापर्यंत आम्ही देशात नवी राजकीय संस्कृती आणण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला आम्ही मोठ्या भक्तिभावाने भिंतींवर कमळ रंगवले. भिंतींवर रंगवलेले कमळ कधीतरी हृदयावरही रंगेल, असा आमचा विश्वास होता. त्यातूनच आज भाजपने मोठी झेप घेतली, असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदींनी काढले.

भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या शुभारंभप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. या कार्यक्रमात हरदीप सिंग पुरी, पियुष गोयल, अश्विनी वैष्णव, शिवराजसिंह चौहान यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या मोहीमेबाबत मोठे वक्तव्य करत यावेळीही सदस्यत्व मोहीम 10 कोटींचा टप्पा पार करेल, असा आशावाद व्यक्त केला. पंतप्रधान मोदींवरील भारतातील लोकांचे प्रेम आणि भाजपवरील विश्वास पाहून मी विश्वास वाढत असल्याचेही ते म्हणाले. पक्ष कार्यकर्त्यांच्यादृष्टीने संघटना सर्वोच्च आहे. अमित शहा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी सदस्यत्व मोहिमेला प्राधान्य दिले होते. आम्ही संघटनेच्या पद्धती बदलून पक्षाची व्याप्ती वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष : शहा

आमचा पक्ष केवळ जगातील सर्वात मोठा पक्ष नाही, तर सर्व राजकीय पक्षांमध्ये एक अद्वितीय पक्ष आहे. आमच्या पक्षात कार्यकर्ता हा केवळ सदस्य संख्या नसून, आमचा कार्यकर्ता हा जिवंत घटक आहे. तसेच तो विचारधारेचा वाहक असून कार्यसंस्कृतीचा संवर्धन करणारा आहे. आपले सरकार आणि संघटना यांच्यातील दुवा म्हणून कार्यकर्ता काम करतो, असेही ते म्हणाले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 2014 मध्ये जेव्हा मोदी भारताचे पंतप्रधान झाले, तेव्हा मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होतो. आमचा निवडणूक जाहीरनामा तयार करताना पंतप्रधान मोदी आम्हाला वारंवार ‘तुम्ही सावधगिरी बाळगा’ अशी सूचना करत होते. मात्र, आजही आम्ही निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांचे पालन करत असल्याचे समाधान वाटते, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Next Article