देशात 500 नवीन चार्जिंग स्टेशनचा शुभारंभ
पंतप्रधान मोदींकडून इलेक्ट्रिक वाहनधारकांना मोठी भेट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
a यासोबतच पंतप्रधानांनी देशात 20 लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) स्टेशन सुरू केले आहेत, त्यापैकी तीन महाराष्ट्रात सुरू करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने पुण्यात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात कोट्यावधी ऊपयांच्या योजना सुरू केल्या. याप्रसंगी अन्य सेवा-सुविधांनाही पंतप्रधानांनी व्हर्च्युअल उद्घाटनाच्या माध्यमातून चालना दिली. केंद्र सरकारने 2025 पर्यंत 10 हजार ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्याचे लक्ष्य ठेवले असून त्यासाठी 1,500 कोटी ऊपये खर्च करण्यात येणार आहेत. देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने पावले उचलत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर अनुदानही दिले जात आहे. मात्र इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यापूर्वी या वाहनांच्या चार्जिंगबाबत लोकांच्या मनात प्रश्न आहे. आता पंतप्रधानांनी देशात 500 नवीन चार्जिंग स्टेशन सुरू केल्याने त्याचा लाभ ईलेक्ट्रिक वाहनधारक घेऊ शकणार आहेत.