शिरोडा उबाठा सरपंच लतिका रेडकर यांचा शिवसेनेत प्रवेश
सावंतवाडी प्रतिनिधी
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिरोडा सरपंच लतिका रेडकर यांनी शिवसेना शिंदे गटात आपल्या सहकाऱ्यांसह प्रवेश केला. शिरोडा परिसराचा विकास केसरकर यांच्या माध्यमातून झाला आणि यापुढे या भागाचा विकास करण्यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे लतिका रेडकर यांनी सांगितले. साडेसहाशे कोटींची तिलारी नळ योजना पूर्णत्वास येणार असल्याने शिरोडा परिसरात आता नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणार असल्याचेही लतिका रेडकर यांनी सांगितले .केसरकर यांच्यामुळेच ही योजना होऊ शकली . केसरकर यांनी रेडकर यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी जिल्हा संघटक संजू परब, जिल्हाप्रमुख अशोक दळवी , सुनील दुबळे आधी उपस्थित होते. केसरकर यांनी शिरोडा भागाच्या विकासासाठी मी कायम प्रयत्नशील आहे. शिरोडा बाजारपेठेचा रस्ता आता काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे .अंतर्गत रस्तेही होतील. या भागातील पर्यटनाला चालना मिळणार आहे .विकासाला लतिका रेडकर यांच्या प्रवेशामुळे आता गती मिळणार आहे. ज्यात आमची सत्ता येणार आहे. त्यामुळे रेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांना विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही केसरकर यांनी दिली.उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे येत्या काळात अनेक कार्यकर्ते , पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्यात असल्याचेही केसरकर यांनी यावेळी सांगितले.