महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शेवटच्या क्षणाला ‘सेव्ह’, तुर्कीची ऑस्ट्रियावर 2-1 ने मात

06:21 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ लाइपझिग (जर्मनी)

Advertisement

पहिल्याच मिनिटात केलेला गोल आणि शेवटच्या सेकंदात गोल करण्याचा उधळवून लावलेला प्रयत्न यामुळे तुर्कीला युरो, 2024 च्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यास मदत झाली. मेरिह डेमिरलने केवळ 57 सेकंदांनंतर केलेल्या सलामीच्या गोलसह दोनदा गोल केले आणि गोलरक्षक मेर्ट गुनोकने इंज्युरी टाइममध्ये स्पर्धेतील एक उत्कृष्ट ‘सेव्ह’ दाखविला. त्याच्या जोरावर तुर्कीने 16 संघांच्या फेरीमध्ये ऑस्ट्रियाचा 2-1 असा पराभव केला.

Advertisement

तुर्कस्तानचे प्रशिक्षक व्हिन्सेंझो मॉन्टेला म्हणाले की, आमची सांघिक भावना शेवटच्या क्षणापर्यंत दिसून आली. अतिरिक्त वेळेची चार मिनिटे सरलेली असताना गुनोकने चपळता दाखवून क्रिस्टोफ बाउमगार्टनरकडून जवळून मारण्यात आलेला हेडर उजवीकडे झेपावत निष्फळ ठरविला. त्या सेव्हने शनिवारी नेदरलँड्सविऊद्ध उपांत्यपूर्व फेरीत तुर्कीचे स्थान निश्चित केले.

ऑस्ट्रियाने तुर्कीच्या गोल करण्याच्या सहा प्रयत्नांच्या तुलनेत 21 प्रयत्न केले आणि नियमितपणे गुनोकची परीक्षा पाहिली. खेळाची सुऊवात चुरशीची झाली. डेमिरलने गोल करण्यापूर्वी पहिल्या 30 सेकंदांत दोन्ही संघांना संधी मिळाली होती. तुर्कीच्या खेळाडूने केलेला गोल हा युरोमध्ये दुसरा सर्वांत जलद गोल ठरला. अल्बानियाने गट स्तरावर इटलीविऊद्ध 23 सेकंदांनंतर गोल केला होता. मध्यांतरानंतर ऑस्ट्रियन नव्या जोमाने उतरले. पण एका कॉर्नरने तुर्कीला दिलासा दिला. यावेळी आर्दा गुलेरने डेमिरला आदर्श क्रॉस पास दिला. त्याने 59 व्या मिनिटाला त्यावर हेडर मारत दुसरा गोल केला.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article