सर्वात मोठे सापांचे संग्रहालय
अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठाला जगातील सर्वाधिक सापांचे संग्रहालय म्हणून ओळखले जाते. ओरेगेन स्टेट युनिव्हर्सिटीने अलिकडेच युएम म्युझियम ऑफ जूलॉजीला सर्प आणि उभयचरांचे 45 हजार नमुने प्रदान केले आहे, यातील 30 हजारांहून अधिक नमुने सापांचे होते, यामुळे मिशिगन युनिव्हर्सिटीच्या संशोधन संग्रहाचे प्रमाण जवळपास दुप्पट झाले आहे. यामुळे या विद्यापीठाच्या नावावर आता विक्रम नोंदविला गेला आहे. युएम म्युझियमकडे आता 70 हजार साप असून असून यातील अनेक साप तुम्ही कधीच पाहिले नसतील.
हे सापांचे कलेक्शन अद्याप सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आलेले नाही. परंतु याचा वापर जगभरातील वैज्ञानिक करू शकतात. म्युझियमधील क्यूरेटर्सनी अल्कोहोलने भरलेल्या शेकडो जारांमध्ये सापांचे नमुने जमविले आहेत. या जारांमध्ये जमविण्यात आलेले साप अत्यंत जिवंत सापांप्रमाणेच दिसतात.
सापांचे हे नमुने एक बायोलॉजिकल ‘टाइम
कॅप्सूल’ दर्शवितात. संशोधकांना दशकांपूर्वी प्राण्यांची संख्या पाहण्यासाठी त्यांची आनुवांशिकी, त्यांच्यातील आजार आणि अन्य गोष्टी समजून घेता येणार आहेत. कालौघात गोष्टी कशा बदलतात, प्राण्यांमध्ये आजार कसे फैलावतात हे समजून घेण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण प्रकारच्या डाटामध्ये हे एक बायोलॉजिकल टाइम कॅप्सूल असल्याचे उद्गार क्यूरेटर आणि इवोल्युशनरी बायोलॉजिस्ट डॅन राबोस्की यांनी काढले आहेत.
जवळपास 50 वर्षांचे हे कलेक्शन नैसर्गिक आपत्तीनंतर प्रजाती कशाप्रकारे बदलल्या हे दर्शविते. सापांचे हे कलेक्शन तयार करण्यासाठी कित्येक वर्षांपर्यंत काम करण्यात आले आहे. याला स्टीरियोटाइप स्टोरेजच्या स्वरुपात पाहिले जाऊ नये, ज्याला अनेक लोक म्युझियमशी जोडतात, हे कलेक्शन टेलिस्कोप किंवा पार्टिकल एक्सीलेटरसारख्या ‘विशाल वैज्ञानिक उपकरणा’सारखे असल्याचे डॅन राबोस्की यांनी म्हटले आहे.