For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

द.आशियातील सर्वात मोठा ई-सायकल कारखाना पुण्यात

07:00 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
द आशियातील सर्वात मोठा ई सायकल कारखाना पुण्यात
Advertisement

महेंद्रसिंग धोनीही करणार गुंतवणूक : दरवर्षी 5 लाख सायकली बनवणार : 15 ऑगस्टपासून उत्पादन होणार सुरु 

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी समर्थित इलेक्ट्रिक वाहन कंपनी ई-मोटोराड दक्षिण आशियातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक सायकल निर्मिती प्रकल्प उभारत आहे. हा प्रकल्प रावेत, पुणे येथे 2,40,000 चौरस मीटरमध्ये पसरलेला आहे. त्याचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होईल आणि 15 ऑगस्टपासून उत्पादन सुरू होईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, एकदा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर वार्षिक 5 लाखांहून अधिक सायकलींचे उत्पादन कारखान्यातून घेतले जाईल. कंपनीच्या या गिगाफॅक्टरीमध्ये, बॅटरी, मोटर्स, डिस्प्ले आणि चार्जरसह इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या जवळजवळ सर्व घटकांचे उत्पादन केले जाईल.

Advertisement

कंपनी 300 लोकांना नियुक्त करेल

नवीन सुविधेसह कंपनी आपली उत्पादन श्रेणीदेखील वाढवेल. यामध्ये नवीन इलेक्ट्रिक सायकलचाही समावेश असेल. कंपनी 300 नवीन लोकांना कामावर घेणार आहे. सध्या या कारखान्यात 250 लोक काम करत आहेत. महेंद्रसिंग धोनी अलीकडेच फाल्गुनी पाठकचे ‘बोले जो कोयल रात में’ हे गाणे गाताना भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला. धोनी यात गुंतवणूक करणार असल्याचे कळते. उत्पादन कारखान्याचे बांधकाम चार टप्प्यात पूर्ण होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. ते पूर्ण झाल्यानंतर, एकाच ठिकाणी बांधलेला हा दक्षिण आशियातील सर्वात मोठा कारखाना असेल. नाविन्यपूर्ण उत्पादने बनवण्याबरोबरच, कंपनी जुन्या उत्पादनांमध्ये आवश्यक बदल करून नवीन उत्पादन देखील लॉन्च करेल.

4.0 मानकांवर देखील लक्ष केंद्रित

ई-मोटोराड देखील 4.0 मानकांवर लक्ष केंद्रित करत आहे. या अंतर्गत, उत्पादनाच्या स्मार्ट आणि आधुनिक पद्धतींचा अवलंब करून तांत्रिकदृष्ट्या प्रगत उत्पादने तयार केली जातात. याशिवाय, ई-मोटोराड इलेक्ट्रिक वाहनांची मालिका सादर करण्याच्या तयारीत आहे, जे सर्व अपग्रेडेड उाह-2 प्लॅटफॉर्मवर तयार केले जातील.

भारतात ई-सायकलचा ट्रेंड झपाट्याने वाढतोय

भारतात ई-सायकल स्वीकारणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या अलीकडील अहवालानुसार, भारतात दुचाकी चालवणाऱ्या प्रत्येक तीनपैकी एक व्यक्ती दुचाकी वाहनाकडे जाण्याचा विचार करत आहे. इंधनाचे दर, पर्यावरणाचे प्रश्न आणि याकडे सरकारचे लक्ष याला जबाबदार धरण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.