For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वात मोठा डिजिटल कॅमेरा 3200 मेगापिक्सेलची लेन्स

06:27 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्वात मोठा डिजिटल कॅमेरा 3200 मेगापिक्सेलची लेन्स
Advertisement

अंतराळाच्या अध्ययनासाठी वैज्ञानिकांनी जगातील सर्वात मोठा डिजिटल कॅमेरा तयार केला आहे. हा 3200 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. चिलीतील वेरा सी. रुबिन ऑब्जर्वेटरीच्या टेलिस्कोपमध्ये हा कॅमेरा बसविण्यात येणार आहे. या कॅमेऱ्याचे नाव एलएसएसटी आहे.

Advertisement

हा कॅमेरा ब्रह्मांडाच्या रहस्यांची उकल करणार आहे. याच्या निर्मितीकरता वैज्ञानिकांना 20 वर्षे लागली आहे

Advertisement

त. रुबिन ऑब्जर्वेटरीच्या सिमोनी सर्वे टेलिस्कोपमध्ये हा कॅमेरा बसविण्यात येणार आहे. हा कॅमेरा अंतराळाची एचडी छायाचित्रे मिळविणार असा विश्वास वैज्ञानिकांना आहे.

हा कॅमेरा डार्क मॅटर, डार्क एनर्जी, आकाशगंगा आणि आमच्या सौरमंडळाचे अध्ययन करण्यास मदत करणर आहे. या कॅमेराच्या निर्मितीकरता अमेरिकेतील नॅशनल सायन्स फौंडेशन आणि अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने मदत केली आहे. एनएसएफ नोईरलॅबने याची निर्मिती केली आहे. हा कॅमेरा अंतराळाची नवी छायाचित्रे मिळवित व्हिडिओही तयार करणार आहे. हा कॅमेरा एका छोट्या कारच्या आकाराचा असल्याचे युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनचे प्राध्यापक जेल्को  इवेजिक यांनी सांगितले आहे.

या कॅमेऱ्याचे वजन 3 हजार किलोग्रॅम आहे. समोरील लेन्स 1.5 मीटर म्हणजेच 5 फूट व्यासाची आहे. या कामासाठी तयार करण्यात आलेली ही सर्वात मोठी लेन्स आहे. दुसरी लेन्स 3 फूट रुंद आहे. या दोन्ही लेन्सना खास प्रकारे तयार करण्यात आलेल्या वॅक्यूम चेंबरमध्ये सेट करण्यात आले आहे.

या कॅमेऱ्याद्वारे काढण्यात आलेली छायाचित्रे इतकी स्पष्ट असतील की तुम्ही 25 किलोमीटर अंतरावर पडलेला गोल्फ बॉलचे देखील एचडी छायाचित्र मिळवू शकणार आहेत. हा पूर्ण चंद्राचे आकर्षक छायाचित्र काढू शकतो. आता या कॅमेऱ्याला पॅक करून 8980 फुटांच्या उंचीवर असलेल्या टेलिस्कोपर्यंत पोहोचविले जाणार आहे. हा कॅमेरा चिलीच्या अँडीज पर्वतावरील सेरोन पॅचोन येथे नेण्यात येणार आहे. तेथे असलेलया सिमोनी सर्वे टेलिस्कोपमध्ये हा कॅमेरा बसविण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.