मंगळावर मोठा ज्वालामुखी
मौना लोआपेक्षाही दुप्पट आहे उंची
अमेरिकेतील अंतराळसंस्था नासाने मंगळ ग्रहाचे एक आकर्षक छायाचित्र शेअर केले आहे. यात मंगळावर असलेला 20 किलोमीटर उंच ज्वालामुखी दिसून येता. आसपास ढगांनी वेढलेला हा ज्वालामुखी पृथ्वीवरील सर्वात मोठ्या ज्वालामुखीपेक्षा जवळपास दुप्पट उंच आहे.
हवाई येथील मौना लोआला पृथ्वीवरील सर्वात उंच ज्वालामुखी म्हटले जाते. समुद्रसपाटीपासून याची उंची 9 किलोमीटर आहे. तर 120 किलोमीटरच्या रुंदीसह हा पृथ्वीवरील सर्वात मोठा ज्वालामुखी आहे. परंतु मंगळावर मिळालेल्या ज्वालामुखीसमोर मौना लोआ देखील छोटा दिसून येत आहे.
नासाकडुन 2011 मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेल्या ओडिसी ऑर्बिटरने मंगळ ग्रहाचे हे छायाचित्र शेअर केले आहे. नासाने 2 मे रोजी थर्मल एमिशन इमेजिंग सिस्टीमद्वारे मंगळ ग्रहाच्या या ज्वालामुखीचे छायाचित्र मिळविले आहे. मंगळ ग्रहावरील इतक्या मोठ्या ज्वालामुखीचे छायाचित्र समोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अर्सिया मान्सची निवड ही सकाळी-सकाळी ढगांवरून आम्ही ज्वालामुखीच्या शिखराला पाहू शकू यासाठीच केली होती, आणि याने आम्हाला निराश केले नसल्याचे थेमिसच्या ऑपरेशनचे नेतृत्व करणारे जॉनाथन हिल यांनी म्हटले आहे. मंगळ ग्रह सूर्यापासून दूर असताना तो ढगांनी वेढलेला असतो. अशा स्थितीत मंगळ ग्रहाच्या दिशेने पाहणे अत्यंत अवघड असते.
नासाने ओडिसी ऑर्बिटरला 2001 मध्ये प्रक्षेपित केले होते. हा ऑर्बिटर दुसऱ्या ग्रहांना प्रदक्षिणा घालत त्यांची छायाचित्रे काढत असतो. मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाचे अध्ययन करण्यासाठी या ऑर्बिटरला त्याच्या कक्षेत 90 अंशांमध्ये फिरावे लागते.