For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शस्त्रास्त्रांचा मोठा साठा काश्मीरमध्ये हस्तगत

06:02 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
शस्त्रास्त्रांचा मोठा साठा काश्मीरमध्ये हस्तगत
Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा येथे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा एक अड्डाउद्ध्वस्त केला. शुक्रवारी रात्री दहशतवादी लपलेले ठिकाण सुरक्षा दलाला सापडले. त्यानंतर जवानांनी येथून शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर राज्य पोलीस आणि लष्कराने संबंधित परिसरात संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. यावेळी जवानांनी खडकांमध्ये बांधलेला दहशतवादी तळ शोधून काढत सर्व शस्त्रे जप्त केली. या कारवाईवेळी दहशतवादी सापडले नाहीत. त्यांच्या शोधासाठी परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, शनिवारी दिवसभरात दहशतवाद्यांचा मागमूस लागू शकला नाही.

Advertisement
Advertisement
Tags :

.