कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बनावट मृत्यूपत्र बनवून बळकावली मोठी जमीन

12:59 PM May 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खोजुर्वे येथील प्रकार,म्हापसा पोलिसात तक्रार

Advertisement

म्हापसा : खोर्जुवे-बार्देश येथील स्व. अनंत नारायण कामत यांच्या नावे बनावट मृत्यूपत्र व बोगस कागदपत्रे तयार करून तसेच वारसदारांचा विश्वासघात करुन सुमारे 2 लाख 80 हजार चौ. मी. जमीन फसवणुकीने हडप केल्याच्या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी जमीन ब्रोकरसह सहा जणांविऊद्ध गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये जमीन ब्रोकर विशांत कामत, सुहासिनी पडवळ, प्रकाश महांब्रे, वामन श्रीधर पोळे, देविदास गोपीनाथ पणजीकर आणि इतरांचा समावेश आहे.

Advertisement

याप्रकरणी रिचा रूपेश शिरोडकर, शैलेश श्रीकृष्ण महात्रे, राजेश वसंत शिरोडकर, रिया राजेश शिरोडकर, रूपेश वसंत शिरोडकर, नीलेश वसंत शिरोडकर, नेहा नीलेश शिरोडकर (रा. पत्रादेवी-तोरसे), राधाकृष्ण दत्ताराम शेटये, शुभांगी राधाकृष्ण शेटये (रा. तोरसे-पेडणे), विजय काशिनाथ मंत्री, विजया विजय मंत्री (रा. आरवली सिंधुदुर्ग), वामन वासुदेव म्हांब्रे, स्मिता वामन म्हांब्रे (रा. सोनारभाट साळगाव), प्रिया कृष्णा पै, कृष्ण विश्वनाथ पै (रा. भोम माशेल), संध्या शैलेश म्हांब्रे, सुगंधा श्रीकृष्ण म्हांब्रे (रा. क्रांतीनगर पर्वरी) यांनी तक्रार दाखल केली आहे.

नोव्हेंबर 2024 चा प्रकार 

हा प्रकार नोव्हेंबर 2024 पूर्वी घडल्याचे समोर आले आहे. तक्रारीनुसार स्व. अनंत कामत यांचे मे 2021 मध्ये, तर त्यांच्या पत्नी स्व. प्रभावती कामत यांचे जून 2009 मध्ये निधन झाले होते. त्यांना मुल नव्हते. अनंत कामत यांचे अविवाहित बंधूही दिवंगत झाले आहेत. त्यांच्या तीन बहिणी विवाहित असून मयत अनंत कामत दांपत्याने कोणतेही अधिकृत मृत्यूपत्र तयार केले नव्हते.

बनावट मृत्यूपत्र 

संशयितांनी बनावट मृत्यूपत्र तयार करून सर्वे क्र. 52/0, 51/3, 50/7, 100/7, 100/1, 53/8, 55/8, 55/9, 28/1 (भाग), 140/1 (भाग) मधील एकूण 2.80 लाख चौ.मी. जमीन बळकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हे बनावट मृत्यूपत्र मुंबईतील नोटरी आर. बी. गुप्ता व अॅड. पी. के. पाठक यांच्या संगनमताने तयार करण्यात आले असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. संबंधित नोटरी व वकिलांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. या तक्रारीच्या आधारे म्हापसा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article