For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लंकेचा अफगाणवर 72 धावांनी विजय

06:45 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
लंकेचा अफगाणवर 72 धावांनी विजय
Advertisement

वृत्तसंस्था/ डंबुला

Advertisement

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान लंकेने दुसऱ्या सामन्यात अफगाणचा 72 धावांनी पराभव करुन 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. या सामन्यात लंकेच्या अँजेलो मॅथ्यूजला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

या सामन्यात अफगाणने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. लंकेने 20 षटकात 6 बाद 187 धावा जमविल्या. त्यानंतर अफगाणचा डाव 17 षटकात 115 धावात आटोपला.

Advertisement

लंकेच्या डावामध्ये समरविक्रमाने 42 चेंडूत 5 चौकारांसह 51, निशांकाने 11 चेंडूत 5 चौकारांसह 25, कुशल मेंडीसने 14 चेंडूत 4 चौकारांसह 23, कर्णधार हसरंगाने 9 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 22 तर अँजेलो मॅथ्यूजने 22 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 42 धावा झोडपल्या. समरविक्रमा आणि मॅथ्यूज यांनी सहाव्या गड्यासाठी 66 धावांची भागिदारी केली. लंकेच्या डावात 6 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. अफगाणतर्फे ओमरझाई आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी 2 तर फारुकी आणि नवीन उल हक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर अफगाणचा डाव 17 षटकात 115 धावात आटोपला. अफगाणच्या डावामध्ये करिम जनतने 23 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 28, मोहम्मद नबीने 17 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 27, कर्णधार झद्रनने 7 चेंडूत 2 चौकारांसह 10 तसेच गुरबाजने 8 चेंडूत 2 चौकारांसह 13 धावा जमविल्या. अफगाणच्या डावात 3 षटकार आणि 5 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे मॅथ्यूज, बिनोरा फर्नांडो, हसरंगा आणि पथिराना यांनी प्रत्येकी 2 तर थीक्षणा आणि शनाका यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : लंका 20 षटकात 6 बाद 187 (समरविक्रमा 51, निशांका 25, कुशल मेंडीस 23, हसरंगा 22, अँजेलो मॅथ्यूज नाबाद 42, डिस्लिव्हा 14, असालंका 4, अवांतर 6, ओमरझाई 2-40, नबी 2-25, फारुकी 1-31, नवीन उल हक 1-46), अफगाण 17 षटकात सर्व बाद 115 (करिम जनत 28, नबी 27, झद्रन 10, गुरबाज 13, अवांतर 11, मॅथ्यूज 2-9, बी. फर्नांडो 2-18, हसरंगा 2-19, पथिराना 2-22, थीक्षणा 1-30, शनाका 1-17).

Advertisement
Tags :

.