कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पथुम निसांकाचे वादळी द्विशतक, लंकेचा अफगाणवर 42 धावांनी विजय

06:55 AM Feb 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ पल्लीकेले

Advertisement

शुक्रवारी पल्लीकेले येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेने अफगाणवर 42 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात लंकेच्या पथुम निसांकाने नाबाद 210 धावांची खेळी केली. निसांकाने 139 चेंडूंच्या खेळीत 20 चौकार आणि 8 षटकार मारले. निसांकाच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर लंकेने 50 षटकांत 3 बाद 381 धावा केल्या. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना उमरझाई व मोहम्मद नबी यांनी शानदार शतके झळकावली पण अफगाण संघाला 6 बाद 339 धावा करता आल्या. उभय संघातील दुसरा सामना दि. 11 रोजी पल्लीकेले येथे होईल.

Advertisement

पाथूम निसांका हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा श्रीलंकेचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी श्रीलंकेसाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वोच्च धावा करण्याचा विक्रम सनथ जयसूर्याच्या नावावर होता. जयसूर्याने 2000 मध्ये शारजाच्या मैदानावर भारताविरुद्ध 189 धावांची इनिंग खेळली होती. म्हणजेच निसांकाने जयसूर्याचा 24 वर्षे जुना रेकॉर्ड मोडला आहे. निसंकाच्या या द्विशतकी खेळीच्या जोरावर लंकेने 3 बाद 381 धावांचा डोंगर उभा केला. निसंकाशिवाय अविष्का फर्नांडोने 88 तर सदिरा समरविक्रमाने 45, कुशल मेंडिसने 16 धावा केल्या.

382 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एकवेळ अफगाण संघाची 5 बाद 55 अशी बिकट स्थिती होती. पण, या कठीण स्थितीत अनुभवी अजमतउल्लाह उमरझाई व मोहम्मद नबी यांनी 242 धावांची महत्वपूर्ण भागीदारी साकारली. या जोडीने लंकन गोलंदाजांची तुफानी धुलाई करत एकवेळ सामना आपल्या बाजुने झुकवला होता. उमरझाईने 115 चेंडूत नाबाद 149 धावा केल्या. तर नबीने 130 चेंडूत 136 धावांचे योगदान दिले. नबी बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांनी निराशा केली. यामुळे अफगाण संघाला 6 बाद 339 धावापर्यंत मजल मारता आली व लंकन संघाने हा सामना 42 धावांनी जिंकला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article