For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

थरारक विजयासह लंका अंतिम फेरीत

06:08 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
थरारक विजयासह लंका अंतिम फेरीत
Advertisement

कर्णधार अटापट्टू सामनावीर, भारत-लंका अंतिम लढत रविवारी

Advertisement

वृत्तसंस्था/डंबुला

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात यजमान लंकेने पाकिस्तानचा केवळ एक चेंडू बाकी ठेवून तीन गड्यांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता महिलांच्या आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत भारत आणि लंका यांच्यात अंतिम सामना रविवारी खेळविला जाणार आहे. 48 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 63 धावा जमविणाऱ्या चमारी अटापट्टूला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

शुक्रवारच्या या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली. पाकने 20 षटकात 4 बाद 140 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेने 19.5 षटकात 7 बाद 141 धावा जमवित विजय नोंदविला.

पाकच्या डावात गुल फिरोजाने 24 चेंडूत 3 चौकारांसह 25, मुनीबा अलीने 34 चेंडूत 5 चौकारांसह 37, सिदरा अमीनने 13 चेंडूत 10, कर्णधार निदा दारने  17 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 23, अलिया रियाजने 15 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 16 तर फातिमा सनाने 17 चेंडूत 3 चौकारांसह 23 नाबाद धावा जमविल्या. पाकच्या डावात 2 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे प्रभोदिनी आणि दिलहारी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावात कर्णधार अटापट्टूने शानदार अर्धशतक झळकविले. समरविक्रमाने 13 चेंडूत 2 चौकारांसह 12, दिलहारीने 18 चेंडूत 2 चौकारांसह 17, संजीवनीने 22 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 24, सुगंधीका कुमारीने 9 चेंडूत 2 चौकारांसह 10 धावा जमविल्या. संजीवनीने विजयी धाव घेतली. लंकेच्या डावात 2 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे सादीया इक्बालने 16 धावांत 4 तर निदा दार आणि सोहेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक: पाक 20 षटकात 4 बाद 140 (मुनीबा अली 37, फिरोजा 25, अमिन 10, निदा दार 23, अलिया रियाज नाबाद 16, फातिमा सना नाबाद 23, प्रभोदिनी आणि दिलहारी प्रत्येकी 2 बळी), लंका: 19.5 षटकात 7 बाद 141 (अटापट्टू 63, समर विक्रमा 12, दिलहारी 17, संजीवनी नाबाद 24, सुगंधीका कुमारी 10, सादिया इक्बाल 4-16, निदा दार व सोहेल प्रत्येकी 1 बळी)

Advertisement
Tags :

.