For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पहिल्या कसोटीत लंका सुस्थितीत

06:00 AM Feb 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
पहिल्या कसोटीत लंका सुस्थितीत
Advertisement

मॅथ्यूज, चंडिमल यांची शतके, लंका 212 धावांनी आघाडीवर

Advertisement

वृत्तसंस्था /कोलंबो

येथे सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात यजमान लंकेने अफगाणवर शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर 212 धावांची भक्कम आघाडी मिळवली. लंकेच्या पहिल्या डावात मॅथ्यूज आणि चंडिमल यांनी शानदार शतके झळकवली. लंकेने दिवसअखेर पहिल्या डावात 6 बाद 410 धावा जमवल्या. या सामन्यात अफगाणचा पहिला डाव 198 धावात आटोपला. रेहमत शहाने 13 चौकारांसह 91 तर इक्रम अलीकल आणि कयास अहमद यांनी प्रत्येकी 21 तर नूर अली झेद्रानने 31 धावा जमवल्या. लंकेतर्फे विश्वा फर्नांडोने 51 धावात 4, असिथा फर्नांडो आणि प्रभात जयसुर्या यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. लंकेने बिनबाद 80 या धावसंख्येवरून शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाला प्रारंभ केला आणि दिवसअखेर त्यांनी 101.2 षटकात 6 बाद 410 धावा जमवत अफगाणवर 212 धावांची भक्कम आघाडी मिळवली.

Advertisement

मधुशका आणि करुणारत्ने या सलामीच्या जोडीने 93 धावांची भागीदारी केली. मधुशकाने 6 चौकारांसह 37 तर करुणारत्नेने 12 चौकारांसह 77 धावा जमवल्या. कुशल मेंडिस 1 चौकारांसह 10 धावा जमवत लवकर बाद झाला. लंकेची स्थिती यावेळी 3 बाद 148 अशी होती. अँजेलो मॅथ्यूज आणि चंडिमल यांनी दमदार शतके नोंदवत आपल्या संघाला मजबूत स्थितीत नेले. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 232 धावांची द्विशतकी भागीदारी केली. मॅथ्यूजने 259 चेंडूत 3 षटकार आणि 14 चौकारांसह 141 तर चंडिमलने 181 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 107 धावा जमवल्या. समरविक्रमा 1 षटकार आणि 3 चौकारांसह 21 धावावर खेळत आहे. कर्णधार धनंजय डिसिल्वा खाते उघडण्यापूर्वीच पहिल्याच चेंडूवर धावचित झाला. अफगाणतर्फे नावेद झेद्रान आणि कयास अहमद यांनी प्रत्येकी दोन तर निजात मसूदने एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : अफगाण प. डाव 62.4 षटकात सर्वबाद 198, लंका प. डाव 101.2 षटकात 6 बाद 410 (मधुशका 37, करुणारत्ने 77, अँजेलो मॅथ्यूज 141 दिनेश चंडिमल 107, समरविक्रमा खेळत आहे 21, अवांतर 17, नावेद झेद्रान आणि कयास अहमद प्रत्येकी दोन बळी).

Advertisement
Tags :

.