For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी लांगम छाओबा देवी

06:03 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी लांगम छाओबा देवी
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

माजी महिला फुटबॉलपटू लांगम छाओबा देवी यांची राष्ट्रीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी निवड निश्चित झाली आहे. आयएम विजयन यांच्या नेतृत्वाखालील एआयएफएफ तांत्रिक समितीने या पदासाठी त्यांची शिफारस केली होती.

51 वर्षीय लांगम देवी यांनी 1999 मध्ये फिलिपाईन्स येथे झालेल्या आशियाई चम्पियनशिपमध्ये भारतीय महिला संघाचे कर्णधारपद भूषविले होते. मुख्य प्रशिक्षकपद मिळण्यासाठी त्यांनी भारतीय संघाचे साहायक प्रशिक्षकपदी काम पाहिले आहे. मणिपूरच्या लांगम देवी यांनी 1998 मध्ये झालेल्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ‘बरीच चर्चा व विचारविनिमय केल्यानंतर तांत्रिक समितीने लांगम छाओबा देवी यांची राष्ट्रीय वरिष्ठ महिला संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदासाठी शिफारस केली,’ असे एआयएफएफने म्हटले आहे.

Advertisement

उत्तर-पूर्व विभागात एएफसी अ प्रशिक्षक परवाना असणाऱ्या लांगम देवी या एकमेव महिला प्रशिक्षक आहेत. तांत्रिक समितीची शिफारस म्हणून नियुक्ती केल्यासारखेच असून एआयएफएफ कार्यकारिणीच्या पुढील बैठकीवेळी त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. तांत्रिक समितीच्या या व्हर्च्युअल बैठकीस विजयन अध्यक्ष होते. याशिवाय पिंकी बोमपाल मगर, शब्बीर अली, व्हिक्टर अमलराज, संतोष सिंग, क्लायमॅक्स लॉरेन्स हेही बैठकीत सामील झाले होते. एआयएफएफचे तांत्रिक संचालक सईद शबिर पाशा हेही उपस्थित होते. या समितीने प्रिया पीव्ही व रोनिबाला चानू यांचीही साहायक प्रशिक्षक व गोलरक्षण प्रशिक्षकपदासाठी शिफारस केली आहे.

Advertisement
Tags :

.