महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलन

06:32 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

100 जणांचा मृत्यू : अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था/ पोर्ट मोरेस्बी

Advertisement

पापुआ न्यू गिनीच्या काओकलाम भागात भूस्खलनात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, पापुआ न्यू गिनीची राजधानी पोर्ट मोरेस्बीच्या वायव्येस 600 किलोमीटर अंतरावर असलेल्या एन्गा प्रांतातील काओकलाम भागात स्थानिक वेळेनुसार पहाटे 3 वाजता भूस्खलन झाले. बचाव पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर भूस्खलनामुळे उद्ध्वस्त झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले आहे. पापुआ न्यू गिनीच्या दुर्गम पर्वतीय भागात भूस्खलनाने एक गाव पूर्णपणे गाडल्यामुळे अनेक लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भूस्खलनात मृतांची संख्या 100 पेक्षा जास्त असल्याचा अंदाज स्थानिक लोकांच्या हवाल्याने देण्यात आला आहे. पापुआ न्यू गिनीच्या अधिकाऱ्यांनी या आकडेवारीची पुष्टी केलेली नाही. तथापि, भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल पंतप्रधानांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. भूस्खलन झालेल्या ठिकाणी बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article