For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुसळधार पावसामुळे अरुणाचलमध्ये भूस्खलन

07:00 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुसळधार पावसामुळे अरुणाचलमध्ये भूस्खलन
Advertisement

चीन सीमेलगतच्या दिबांग खोऱ्याशी संपर्क तुटला

Advertisement

वृत्तसंस्था /इटानगर

देशातील बहुतांश भाग उष्णतेच्या लाटेने त्रस्त असतानाच अऊणाचल प्रदेशात मुसळधार पावसाने कहर केला आहे. चीनच्या सीमेला लागून असलेल्या अऊणाचल प्रदेशात सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सामान्य जनजीवन ठप्प झाले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. भूस्खलनामुळे रस्त्यांच्या जाळ्याचे मोठे नुकसान झाले आहे. चीनच्या सीमेवर असलेल्या दिबांग खोऱ्याला देशाशी जोडणारा एकमेव महामार्ग भूस्खलनात पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. महामार्गाचा काही भाग वाहून गेल्यामुळे दिबांग खोऱ्यातून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडचणी येत आहेत. भूस्खलनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Advertisement

अऊणाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. आता त्याचे परिणामही दिसून येत आहेत. उंच डोंगराळ भाग असल्याने राज्याच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी आपल्या ‘एक्स’ खात्यावरून मुसळधार पावसामुळे झालेल्या मोठ्या विध्वंसाचा व्हिडिओ शेअर केला आहे. अऊणाचल प्रदेशातील हवामान गेल्या काही दिवसांपासून खूपच खराब आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. डोंगराळ भाग असल्याने नुकसानही अधिक झाले आहे.

अऊणाचल प्रदेशची सीमा चीनला लागून आहे. अशा स्थितीत राज्याचे अनेक भाग सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. दिबांग व्हॅली चीनला लागून असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे. दिबांग खोऱ्याला जोडणारा एकमेव महामार्ग भूस्खलनात वाहून गेला आहे. त्यामुळे दिबांग खोऱ्याच्या दिशेने जाणे किंवा तेथून देश व राज्याच्या अन्य भागांशी जोडणे अशक्मय झाले आहे. अशा स्थितीत खोऱ्यात राहणाऱ्या लोकांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दिबांग खोऱ्याला देशाच्या इतर भागांशी जोडणारा महामार्ग दुऊस्त करून वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Advertisement
Tags :

.