महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

यमुनोत्रीवर निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन

06:29 AM Nov 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Landslide in under-construction tunnel on Yamunotri
Advertisement

40 हून अधिक कामगार अडकल्याची माहिती : मदत व बचावकार्याला वेग

Advertisement

वृत्तसंस्था/ उत्तरकाशी

Advertisement

उत्तराखंडमधील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्मयरा ते दंडलगाव या बोगद्यात भूस्खलनाची दुर्घटना घडली. एनएचआयडीसीएलच्या निर्देशानुसार नवयुग कंपनीमार्फत हा बोगदा बांधण्यात येत आहे. बोगद्यात 40 हून अधिक मजूर अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन उत्तरकाशीने याला दुजोरा दिला आहे. कंपनीकडून ढिगारे हटवण्याचे काम सुरू आहे. मदत व बचावकार्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली असून 108 ऊग्णवाहिका घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. भुयारीमार्गात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात, अशी माहिती बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

उत्तरकाशी जिह्यात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळला आहे. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शक्मयता नाकारता येत नाही. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकारी अभिषेक ऊहेला यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या असून त्यांना तात्काळ आपापल्या कामाच्या ठिकाणी जाण्याचे आणि मदत व बचावकार्यासाठी 24 तास सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनीही सर्व लक्ष अडकलेल्या कामगारांच्या बचावावर केंद्रीत केले आहे. घटनेपासून मी सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. अपघाताची संपूर्ण माहिती आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी हजर आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

उत्तराखंड सरकार आणि प्रशासनाच्या पथकांनी बचावकार्य सुरू केले आहे. आतमध्ये कामगारांसाठी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. बोगद्याच्या आत एक अतिरिक्त ऑक्सिजन पाईप देखील देण्यात आला आहे. बोगद्यात सर्व कामगार सुरक्षित आहेत. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. मदतकार्यासाठी पोलीस दलासह एसडीआरएफ आणि इतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. हे भूस्खलन बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून सिल्क्मयराकडे 200 मीटर अंतरावर झाले, तर काम करणारे कामगार वाहनाच्या प्रवेशद्वारापासून 2,800 मीटर आत होते, असे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे एडीजी अंशुमन यांनी सांगितले. ऑलवेदर रोड प्रकल्पांतर्गत तयार होत असलेल्या बोगद्याची लांबी 4.5 किमी आहे. त्यापैकी चार किमीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यापूर्वी बोगदा बांधण्याचे उद्दिष्ट सप्टेंबर 2023 होते, मात्र आता ते मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. चारधाम रोड प्रकल्पांतर्गत या सर्व हवामान बोगद्याच्या निर्मितीमुळे उत्तरकाशी ते यमुनोत्री धाम हा प्रवास 26 किलोमीटरने कमी होणार आहे.

यावषी ऑगस्टमध्ये, शिवपुरी भागातील पुराच्या प्रवाहाच्या पाण्याने भरलेल्या ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वेलाईन प्रकल्पाच्या बोगद्यात सुमारे 114 कामगार अडकले होते. मात्र, पोलिसांच्या पथकाने पाणी बाहेर काढले आणि दोरीच्या सहाय्याने सर्व 114 कामगारांची सुटका केली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article