कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जम्मू काश्मीरमधील रियासीमध्ये भूस्खलन

06:22 AM Aug 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एकाच कुटुंबातील सात जण ठार : रामबनमध्ये ढगफुटीत चौघांचा मृत्यू

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

जम्मू-काश्मीरमधील रियासी जिह्यातील बदर गावात शनिवारी सकाळी भूस्खलन झाले. या आपत्तीमध्ये एकाच कुटुंबातील सातजण ठार झाले असून सर्वांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. या आपत्तीमध्ये आणखी काही लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. इतर लोकांचा शोध सुरू आहे. या आपत्तीसोबतच रामबनमधील राजगड परिसरात झालेल्या ढगफुटीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. तसेच एक व्यक्ती बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत. पुरासोबतच भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत. प्रामुख्याने जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या तीन राज्यांमध्ये मोठ्या आपत्ती घडल्या आहेत. हिमाचल प्रदेशातील मंडीमधील गोहरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसानंतर नंदी पंचायतीतील नसेनी नाल्याला आलेल्या पाण्यामुळे अनेक वाहने वाहून गेली. शिमलाच्या जाटोग कॅन्टमध्ये भूस्खलन झाले. लष्कराच्या निवासी इमारती रिकामी करण्यात आल्या. अमृतसर, पठाणकोटसह पंजाबमधील 8 जिह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. 250 हून अधिक गावे 5 ते 15 फूटांपर्यंत पाण्याने भरली आहेत. आतापर्यंत 8 जणांचा पुरामध्ये मृत्यू झाला आहे. 3 लोक बेपत्ता आहेत.

उत्तराखंडमधील चमोली, रुद्रप्रयाग, टिहरी आणि बागेश्वर येथे ढगफुटीच्या घटना घडल्या. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला तर 11 जण बेपत्ता आहेत. बागेश्वरच्या कापकोटमध्येही अनेक घरांचे नुकसान झाले आहे. उत्तर प्रदेशातील 18 जिल्हे पुराच्या विळख्यात आहेत. पाऊस आणि पुरामुळे राज्यात आतापर्यंत 774 घरे कोसळली आहेत. वाराणसीतील सर्व 84 घाटांचा संपर्क तुटला आहे. जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे पावसामुळे वैष्णोदेवी यात्रा 5 दिवसांसाठी थांबवण्यात आली आहे. 26 ऑगस्ट रोजी यात्रा मार्गावर भूस्खलन होऊन 34 जणांचा मृत्यू झाला.

फिरोजपूरमध्ये 3000 लोकांना वाचवले

पंजाबमधील फिरोजपूरमध्ये सतलज नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पंजाबचा मोठा भाग पुराच्या विळख्यात सापडला आहे. फिरोजपूर जिह्यातील सुमारे 100 गावे बाधित आहेत. जिल्हा प्रशासन, लष्कर, बीएसएफ, एनडीआरएफ आणि पोलीस सतत बचावकार्यात गुंतले आहेत. बाधित भागात गझनीवाला, कालुवाला, तेडीवाला, निहाला लवेरा, बग्गेवाला यांचा समावेश आहे. आरोग्य विभागाचे पथक मलेरिया-डेंग्यू रोखण्यासाठी गणेशवाला, निहाला किल्चा, दोना मत्तर येथे औषध फवारणी करत आहेत.

हरियाणातही पूरसदृश परिस्थिती

हरियाणामध्ये कुरुक्षेत्रातील मार्कंडा नदी धोक्याच्या पातळीवर आहे. तिचे पाणी कठवा गावात शिरल्यामुळे अनेक कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. येथे सध्या पूरसदृश परिस्थिती आहे. रस्ते आणि शेते पाण्यात बुडाली आहेत. रस्त्यांवर गुडघाभर पाणी आहे. प्रशासनाने कठवा व्यतिरिक्त गुमटी, पट्टी जामदा, मुघल मजरा, मलकपूर, कळसाणा आणि तंगौर येथे अलर्ट जारी केला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article