For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लालूप्रसाद यादव यांच्या निकटवर्तीयाला अटक

06:43 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
लालूप्रसाद यादव यांच्या निकटवर्तीयाला अटक
Advertisement

ईडीकडून कारवाई : राजद आमदाराचा पती

Advertisement

वृत्तसंस्था/ पाटणा

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना मोठा झटका बसला आहे. ईडीने लालूप्रसाद यांचे निकटवर्तीय, वाळू माफिया आणि माजी आमदार सुभाष यादव यांना रविवारी अटक केली आहे.

Advertisement

अवैध वाळू खनन आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने यादव यांना अटक केली आहे. केंद्रीय यंत्रणेने शनिवारी बिहारची राजधानी पाटण येथे सुभाष यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. यानंतर कारवाईदरम्यान 2.3 कोटी रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली होती. रविवारी सकाळी ईडीने सुभाष यादव यांना अटक केली आहे.

सुभाष यादव यांना लालूप्रसादांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाते. सुभाष यादव यांचे पक्षात मोठे स्थान आहे. यादव यांच्या पत्नी सध्या राजदच्या आमदार आहेत. सुभाष यादव यांनी झारखंडच्या चतरा मतदारसंघातून मागील लोकसभा निवडणूक लढविली होती, परंतु ते पराभूत झाले होते.

ब्रॉडसन कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीच्या विरोधात बिहार पोलिसांकडून 20 हून अधिक एफआयआर नेंदविण्यात आले होते. ई-चलनचा वापर न करता वाळूचे अवैध खनन करण्याचा आरोप कंपनी आणि तिच्या संचालकांवर आहे. ईडीने मागील वर्षी बिहारचे आमदार आणि संजद नेते राधा चरण साह, त्यांचे पुत्र कन्हैया प्रसाद, ब्रॉडसन कमोडिटीजचे संचालक मिथिलेश कुमार सिंह, बबन सिंह आणि सुरेंद्र कुमार जिंदल यांना अटक केली होती.

Advertisement
Tags :

.