For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लालचंद राजपूत यूएईचे प्रमुख प्रशिक्षक

06:32 AM Feb 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
लालचंद राजपूत यूएईचे प्रमुख प्रशिक्षक
Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisement

भारताचे माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांची संयुक्त अरब अमिरातच्या पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या मुदस्सर नझर यांच्या जागी त्यांची तीन वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.

स्कॉटलंड व कॅनडा यांच्याविरुद्ध होणाऱ्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 तिरंगी मालिकेपासून ते आपल्या कामाला सुरुवात करतील. पुढील महिन्यात ही मालिका होणार आहे. येत्या जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत यूएई संघ पात्रता मिळवू शकला नाही. त्या पार्श्वभूमीवर 62 वर्षीय राजपूत नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement

भारताने 2007 मध्ये झालेल्या पहिल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. लालचंद राजपूत हे त्या संघाचे प्रशिक्षक होते. 2016-17 मध्ये अफगाणिस्तान संघाचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. याच कालावधीत आयसीसीने अफगाण संघाला कसोटी दर्जा दिला होता. 2018-22 या कालावधीत ते झिम्बाब्वे संघाचे प्रशिक्षकही होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली झिम्बाब्वेने 2022 टी-20 वर्ल्ड कपसाठी पात्रता मिळविली होती. या स्पर्धेत झिम्बाब्वेने सुपर 12 फेरीपर्यंत मजल मारली होती.

Advertisement
Tags :

.