महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लालबहादुर शास्त्री यांच्या नातवाचा काँग्रेसला रामराम; भाजपमध्ये केला प्रवेश

06:26 AM Feb 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनी पक्षाच्या सदस्याचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर विभाकर शास्त्री यांनी बुधवारी भाजपचे सदस्यत्व ग्रहण केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्या उपस्थितीत पक्षाच्या राज्य मुख्यालयात शास्त्राr यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात लालबहादुर शास्त्राr यांच्या ‘जय जवान, जय किसान’च्या दृष्टीकोनाला आणखी मजबूत करून देशाची सेवा करू शकणार असल्याचे मला वाटते. भाजपमध्ये सामील करून घेतल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जगतप्रकाश न•ा, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, ब्रजेश पाठक यांचे आभार मानू इच्छितो. इंडिया आघाडीची स्वत:ची अशी कुठलीच विचारसरणी नाही. या आघाडीचा उद्देश केवळ पंतप्रधानपदावरून मोदींना हटविणे आहे. काँग्रेसची विचारसरणी नेमकी कोणती हे आता राहुल गांधी यांनीच सांगावे असे विभाकर शास्त्राr यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article