लक्ष्य सेनची विजयी सलामी
किरण जॉर्ज, रोहन कपूर-रुत्विका पराभूत
वृत्तसंस्था / कुमामोटो (जपान)
भारताच्या लक्ष्य सेनने बुधवारी येथे कोकी वातानबेवर सरळ गेममध्ये विजय मिळवत कुमामोटो मास्टर्स जपान बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
येथे सातव्या मानांकीत सेनने केवळ 39 मिनिटांत जागतिक क्रमवारीत 26 व्या क्रमांकावर असणाऱ्या जपानी प्रतिस्पर्ध्याला 21-12, 21-16 असे हरवले. जागतिक क्रमवारीत 15 व्या क्रमांकाचा हा सेन आता सिंगापूरचा जिया हेंग जेसन तेह आणि कॅनडाचा व्हिक्टर लाई यांच्या सामन्यातील विजेत्याशी सामना करेल. परंतु मलेशियाच्या जिंग हाँग कोककडून 20-22, 10-21 असा पराभव पत्कारावा लागल्यानंतर भारताच्या किरण जॉर्जसाठी हा मार्ग संपला. रोहन कपूर आणि रुत्विका शिवानी ग•s या मिश्र दुहेरी जोडीनेही पहिल्या फेरीत पराभूत झाले असले तरी त्यांनी कडवा प्रतिकार केला. भारतीय जोडीला प्रेस्ली स्मिथ आणि जेनी गाई या अमेरिकन जोडीकडून 12-21, 21-19, 20-22 असा पराभव पत्करावा लागला.