महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लक्ष्य सेन विजयी सलामी

06:28 AM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ जकार्ता

Advertisement

मंगळवारपासून येथे सुरु झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या इंडोनेशिया खुल्या सुपर 1000 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा लक्ष्य सेन याने एकेरीत विजयी सलामी देताना जपानच्या सुनेयामाचा पराभव केला.

Advertisement

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात सेनने सुनियामाचा 21-12, 21-17 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 40 मिनिटात पराभव करत दुसरी फेरी गाठली. सेनने यापूर्वी प्रेंच खुली आणि अखिल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. पण त्याची ऑलिम्पिक पात्रतेची संधी थोडक्यात हुकली आहे. भारताच्या किरण जॉर्जला मात्र पहिल्या फेरीतच हार पत्करावी लागली. चीनच्या वेंगने किरण जॉर्जचा 11-21, 21-10, 22-20 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. मिश्र दुहेरीत भारताच्या सुमित रे•ाr आणि सिक्की रे•ाr यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. अमेरिकेच्या चीयु आणि गेई यांनी सुमित रे•ाr व सिक्की रे•ाr यांचा 18-21, 21-16, 21-17 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत प्रणॉयचा सलामीचा सामना प्रियांश राजवतशी होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article