For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लक्ष्य सेन 13 व्या स्थानावर

06:29 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
लक्ष्य सेन 13 व्या स्थानावर
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारताचा प्रमुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने बीडब्ल्यूएफने जाहीर केलेल्या ताज्या जागतिक मानांकनात 13 व्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याने एकूण पाच स्थानांची प्रगती केली. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत त्याने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती, या कामगिरीचा त्याला मानांकनात वाढण्यास मदत झाली आहे.

ऑलिम्पिक गेम्स पात्रता मानांकनातही तो 15 वरून 12 व्या स्थानावर पोहोचला आहे. एप्रिलअखेर पहिल्या 15 क्रमांकावर असणारे खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार आहेत. त्यानुसार लक्ष्य सेन ऑलिम्पिक पात्रता मिळविण्याच्या मार्गावर आहे. पॅरिसच्या शर्यतीत एचएस प्रणॉय सध्या नवव्या स्थानावर आहे.

Advertisement

नोव्हेंबर 2022 मध्ये लक्ष्य सेनने जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती. ते त्याचे कारकिर्दीतील सर्वोच्च मानांकन होते. मात्र गेल्या वर्षींच्या एप्रिलपर्यंत त्याची घसरण झाल्याने तो 25 व्या स्थानावर पोहोचला होता. पण यातून सावरत त्याने सुधारणा केली आणि ऑगस्टपर्यंत त्याने 11 व्या स्थानापर्यंत झेप घेतली होती. पण यावर्षी खराब प्रदर्शन झाल्याने 20 व्या स्थानापर्यंत त्याची घसरण झाली. या मोसमात अनेक स्पर्धांत तो पहिल्याच फेरीत पराभूत झाल्याने त्याच्या ऑलिम्पिक पात्रतेबाबत साशंकता निर्माण झाली होती. पण फ्रेंच ओपन, ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप या स्पर्धांत उपांत्य फेरी गाठल्याने त्याची क्रमवारी सुधारली असून त्याला पात्रता मिळण्याची संधी मिळाली आहे.

ऑलिम्पिक पात्रता क्रमवारीत एचएस प्रणॉय नवव्या, किदाम्बी श्रीकांत 27 व्या, प्रियांशू राजावत 32 व्या स्थानावर आहे. महिलांमध्ये पीव्ही सिंधू 11 व्या क्रमांकावर आहे. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज व चिराग शेट्टी मानांकनात अग्रस्थानी आहेत तर अश्विनी पोनप्पा व तनिशा क्रॅस्टो महिला दुहेरीत 20 व्या स्थानावर आहेत मात्र त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांची 26 व्या स्थानावर घसरण झाली आहे.

Advertisement
Tags :

.