कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लक्ष्य सेन, कश्यप तिसऱ्या फेरीत

06:00 AM Dec 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /गुवाहटी

Advertisement

Advertisement

85 व्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत लक्ष्य सेन आणि आकर्षी कश्यप यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या एकेरीची तिसरी फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीच्या गुरुवारी खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आणि टॉप सिडेड लक्ष्य सेनने टी. सिद्धार्थचा 21-8, 21-5 अशा गेम्समध्ये पराभव केला. महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात आकर्षी कश्यपने रितूपर्णा दासचा 21-18, 21-11 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. हा सामना 32 मिनिटे चालला होता. अन्य एका सामन्यात पुरुष विभागात आयुष शेट्टीने नीर नेहवालचा 23-25, 21-18, 21-12 असा पराभव केला. महिलांच्या विभागात द्वितीय मानांकित अस्मिता चलियाने सुझेन बोर्गोहेनवर 21-13, 21-10 अशी मात केली. उनाती हुडाने मनीषा तिर्कीवर 21-18, 21-17 अशी मात करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला. तन्वी शर्माने श्रेया लेलेचे आव्हान 21-18, 22-24, 21-13 असे संपुष्टात आणले. हा सामना 56 मिनिटे चालला होता. ध्रुव कपिला आणि तनीषा क्रॅस्टो यांनी अब्दुल रेहमान सय्यद व एम. लंका यांचा 21-5, 21-14 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article