महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लक्ष्य सेन सेमीफायनलमध्ये

06:55 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चिनी तैपेईच्या चोऊ तियानचा केला पराभव

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऐतिहासिक कामगिरी करताना ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे. शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात लक्ष्यने चिनी तैपेईच्या तगड्या चोऊ तियानला पराभवाचा धक्का दिला. या विजयासह ऑलिम्पिक इतिहासात बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत उपांत्य फेरी गाठणारा लक्ष्य सेन पहिला भारतीय ठरला आहे.

गुरुवारचा दिवस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी धक्कादायक राहिला. दोन वेळ ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू, पदकाची प्रबळ दावेदार असणारी सात्विक व चिराग या जोडीची हार भारतासाठी धक्कादायक होती. दिग्गज खेळाडू पराभूत झाल्यानंतर युवा खेळाडू लक्ष्य सेनवर भारतीय बॅडमिंटनची मदार असणार आहे. शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात लक्ष्यने तैपेईच्या तियानला 19-21, 21-15, 21-12 असे पराभूत केले. 59 मिनिटे हा सामना चालला. प्रारंभी, तैपेईच्या तियानने शानदार सुरुवात करताना पहिला गेम जिंकला. यानंतर लक्ष्यने जोरदार कमबॅक केले. दुसऱ्या गेममध्ये त्याने प्रतिस्पर्धी तियानवर वर्चस्व गाजवले व हा गेम 21-15 असा जिंकला. यानंतर तिसऱ्या व निर्णायक गेममध्येही त्याने तियानला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. हा गेम त्याने 21-12 असा सहज जिंकला व थाटात उपांत्य फेरी गाठली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article