लक्ष्य सेन अंतिम फेरीत
वृत्तसंस्था / सिडनी
विश्व बॅडमिंटन फेडरेनशच्या येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या 500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनने पुरूष एकेरीची अंतिम फेरीत गाठताना चीन तैपेईच्या सहाव्या मानांकीत चोयु चेनचा पराभव केला.
2021 च्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या लक्ष्य सेनने शनिवारी पुरूष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात चोयु चेनचा 17-21, 24-22, 21-16 अशा गेम्समध्ये पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. हा उपांत्य सामना 86 मिनिटे चालला होता. 24 वर्षीय लक्ष्य सेनने चालु वर्षीच्या प्रारंभी झालेल्या हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण त्याला चालु वर्षीच्या बॅडमिंटन हंगात एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. आता जपानचा तेनाका आणि चीन तेपैईचा लीन यी यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार असून या सामन्यातील विजयी खेळाडूबरोबर लक्ष्य सेनचा रविवारी अंतिम सामना होणार आहे.