लक्ष्य सेन उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था / कुमामोटो (जपान)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या 475,000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रक्कमेच्या कुमामोटो मास्टर्स जपान खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनने पुरूष एकेरीची उपांत्य फेरी गाठताना सिंगापूरच्या माजी विश्वविजेत्या लोह येव चा सरळ गेम्समध्ये पराभव केला.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या भारताच्या सातव्या मानांकीत लक्ष्य सेनने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सिंगापूरच्या नवव्या मानांकीत येवचा 21-13, 21-17 अशा सरळ गेम्समध्ये 40 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. आतापर्यंत उभय खेळाडूंमध्ये 10 सामने झाले असून त्यापैकी सात सामने सेनने तर तीन सामने येवने जिंकले आहेत. गेल्या सप्टेबरमध्ये झालेल्या हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनने उपविजेतेपद मिळविले होते. लक्ष्य सेनचा आता उपांत्य फेरीतील सामना जपानच्या सहाव्या मानांकीत निशीमोटोशी होणार आहे.