लक्ष्य, मन्नेपल्ली उपांत्य फेरीत, सात्विक-चिराग बाहेर
वृत्तसंस्था/ मकाऊ
भारताचा स्टार शटलर लक्ष्य सेन आणि आशादायक थऊन मन्नेपल्ली यांनी शुक्रवारी येथे मकाऊ ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुऊष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम कोर्टवर उतरताना जगात 47 व्या क्रमांकावर असलेल्या 23 वर्षीय मन्नेपल्लीने वेग आणि विविधांगी फटक्यांच्या निवडीचे प्रदर्शन करत चीनच्या 87 व्या क्रमांकावर असलेल्या हू झेला 75 मिनिटांच्या लढतीत 21-12, 13-21, 21-18 असे पराभूत केले.
दिवसाच्या उत्तरार्धात राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आणि येथील द्वितीय मानांकित खेळाडू लक्ष्यने एक तास आणि तीन मिनिटे चाललेल्या क्वार्टरफायनलमध्ये चीनच्या झुआन चेन झूवर 21-14, 18-21, 21-14 असा विजय मिळवला. लक्ष्यचा सामना आता पाचव्या मानांकित इंडोनेशियाच्या अल्वी फरहानशी होईल, तर मन्नेपल्लीची लढत मलेशियाच्या जस्टिन होशी होईल. बीडब्ल्यूएफ सुपर 300 स्पर्धेच्या बबतीत मन्नेपल्लीचा हा पहिलाच उपांत्य फेरीतील प्रवेश आहे. फेब्रुवारीत तो जर्मन ओपनमध्ये उपांत्य फेरीत पोहोचला होता.
तथापि, सात्विकसाईराज रान्कीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांना उपांत्यपूर्व फेरीत चुंग होन जियान आणि हैकल मोहम्मद या मलेशियन जोडीकडून 14-21, 21-13, 20-22 असा पराभव पत्करावा लागला. चार वर्षांपूर्वी पुलेला गोपीचंद अकादमीत सामील झालेल्या मन्नेपल्लीने गेल्या दोन वर्षांपासून त्याची फिटनेस, चपळता आणि हालचाली सुधारण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. या आठवड्यात त्याने केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ त्याला मिळाले. यापूर्वी त्याने हाँगकाँगच्या अव्वल मानांकित ली चेउक यिउलाही हरवले.