निरवडेतील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा लक्ष्मीनारायण वालावल संघ मानकरी
तर फोंडा पंचक्रोशी संघ ठरला उपविजेता
न्हावेली / वार्ताहर
निरवडे येथील श्री देव महापुरुष कला क्रिडा मंडळ,यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी श्री लक्ष्मीनारायण वालावल संघ ठरला.तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पंचक्रोशी फोंडा यांनी पटकाविले.तर तृतीय क्रमांक पंचक्रोशी जामसंडे देवगड,चतुर्थ क्रमांक शिवदैवत नेरुरपार यांना मिळाले. या स्पर्धेला जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.हौशी कबड्डी संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा घेण्यात आली होती.या स्पर्धेत वैयक्तिक बक्षीसे पुढीलप्रमाणे- उकृष्ट चढाईपटू निखिल चव्हाण ( वालावल) उकृष्ट पक्कड शुभम नार्वेकर ( फोंडा) आणि स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू योगेश घाडी ( वालावल) यांना रोख रक्कम आणि चषक देऊन गौरविण्यात आले.पारितोषिक वितरण सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे आणि सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.या स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले होते.
यावेळी स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार विनायक राऊत आणि सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख उपस्थिती ॲड.अनिल निरवडेकर सरपंच सौ.सुहानी गावडे,उपसरपंच अर्जुन पेडणेकर,माजी सरपंच सदा गावडे,माजी सभापती प्रियांका गावडे,खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर,वेत्ये सरपंच गुणाजी गावडे,ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार,तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र गावडे,सुभाष गावडे,लाडू गावडे,रवी जाधव,भिकाजी गावडे,अक्षय माशाळ,ओमप्रकाश तिवरेकर,आदी उपस्थित होते.तसेच या स्पर्धेला तहसीलदार श्रीधर पाटील,सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण,माजी सभापती पंकज पेडणेकर,कास सरपंच प्रविण पंडीत यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्पर्धेला भेट दिली.