महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कुद्रेमनीतील नुकसानग्रस्त घरांचा लक्ष्मी हेब्बाळकर यांचा पाहणी दौरा

10:40 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /कुद्रेमनी 

Advertisement

राज्य महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नुकतीच कुद्रेमनी गावाला भेट देवून गावातील पडझड झालेल्या घरांना भेट देवून पाहणी केली. यंदाच्या पावसाळ्यात गावातील अनेक नागरिकांच्या घरांची पडझड होवून नुकसान झाले. कलाप्पा पाटील (हालू पाटील), तोराप्पा नाईक, रामू नाईक, वैजू राजगोळकर, नारायण सुतार आदींसह अनेक नागरिकांच्या घरांची पडझड होवून नुकसान झाले. नुकसानग्रस्त नागरिकांच्या घरोघरी त्यांनी प्रत्यक्ष जाऊन भेट दिली. त्यांना अर्ज देण्याचे आवाहन केले. नुकसानग्रस्तांपैकी काहीजणांना पाच हजार रुपये तसेच पावसाळी परिस्थितीत उत्तम कामगिरी केल्यामुळे केपीटीसीएल कर्मचारी यांना पाच हजार रुपये प्रोत्साहनपर मानधन दिले. यावेळी ग्रा. पं. माजी सदस्य दीपक पाटील, ग्रामस्थ अरुण देवण, विनायक पाटील सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील, ता. पं. सदस्य शुभांगी राजगोळकर, तलाठी कौस्तुभ मोमीन, अभियंता नाझर, शशिकांत पाटील, रुक्माण्णा कागणकर, वैजू राजगोळकर, रामलिंग पाटील, संजय राजगोळकर, युवराज कदम, रसुत मुल्ला, ग्रा.पं. सदस्य विमल साखरे, लता शिवणगेकर, सुरेश पाटील, शिवानी गुरव, बाळू कदम आदींचा या पाहणी दौऱ्यात सहभाग होता.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article