महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘त्या’ कामगाराच्या कुटुंबीयांची लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतली भेट

11:37 AM Aug 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/किणये

Advertisement

नावगे क्रॉस, जवळील स्नेहम टेपिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याला मंगळवार दि.6 रोजी रात्री 8:30 वाजता शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. तर लिफ्टमध्ये अडकलेला यलगोंड सनयल्लाप्पा गुंड्यागोळ (वय 19) रा. मार्कंडेयनगर याचा आगीत होरपळून मृत्यू झाला. त्या कामगाराच्या कुटुंबीयांची महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सोमवारी सकाळी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या घटनेत मार्कंडेयनगर येथील एक जण मृत्युमुखी पडला. तर अन्य तिघे जखमी झाले. यलगोंड आगीत जळून खाक झाला. अग्निशमन दल व जिल्हा पोलीस प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल 15 तासानंतर आग विझविण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी 11.30 वा. यलगोंड यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र तो पूर्ण जळून खाक झाल्यामुळे पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना त्याच्या केवळ अस्थिच दिल्या.

Advertisement

हे दु:ख सदर कुटुंब सहन करू शकले नाही. त्या कामगाराचे आई वडील अतिशय हतबल झाले आहेत. त्याच्या आईने जेवणच केले नाही. अखेर मंत्री हेब्बाळकर यांनी सोमवारी या कुटुंबीयांचे सांत्वन केले व त्या कामगाराच्या आईला स्वत: जेवण भरविले आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगितले. मंगळवारी रात्री कारखान्याला आग लागली तर बुधवारी सकाळीच मंत्री हेब्बाळकर यांच्या सून डॉ. हिता हेब्बाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी जखमी कामगारांचीही भेट घेऊन मदत केली. शनिवारी स्नेहल कारखान्याचे मालक सुरेश मैत्राणी यांनी त्यांच्या आई-वडिलांना 18 लाखाचा धनादेश सुपूर्द केला. सोमवारी मंत्री हेब्बाळकर यांनी या कुटुंबांची चौकशी करून धीर दिला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article